
रत्नागिरी, 3 डिसेंबर, (हिं. स.) : येथील क्षत्रिय मराठा मंडळातर्फे येत्या रविवारी, दि. ७ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता मराठा सप्तपदी वधू वर परिचय मेळाव्याचे आयोजन केले आहे.टीआरपी येथील अंबर हॉल येथे हा मेळावा होणार आहे. यामध्ये मराठा समाजातील विवाहेच्छुक युवक-युवती व पालकांना अनुरूप स्थळे शोधून विवाह जुळवण्याची संधी मंडळाने उपलब्ध करून दिली आहे.
या मेळाव्याला उपस्थित राहणाऱ्या फक्त वधूंसाठी नोंदणी शुल्क माफ करण्यात आले आहे. याप्रसंगी क्षत्रिय मराठा मंडळाच्या वेबसाइटचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. मराठा समाजातील ज्या स्थळांनी याआधीच मंडळामध्ये आपल्या उपवर उमेदवारांची नोंदणी केली आहे, तसेच ज्या स्थळांनी नोंदणी केली नसल्यास त्यांनी येताना वधू-वराची पत्रिका, पोस्टकार्ड आकाराचा फोटो व नोंदणी शुल्क ५०० रुपये भरून मेळाव्याला उपस्थित राहावे. मराठा समाजातील सर्व पालकांनी आपल्या उपवर मुला-मुलीसह या मेळाव्यासाठी प्रत्येक १३० रुपये प्रवेशशुल्क भरून उपस्थित राहावे व मेळाव्याचा योग्य वधू-वर निवडीसाठी लाभ घ्यावा, असे आवाहन क्षत्रिय मराठा मंडळातर्फे करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी 7020357030 किंवा 8830974065 या क्रमांकावर संपर्क साधावा.
--------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी