पुणे - चांदणी चौक ते भूगाव रस्त्यावरील कोंडी सुटणार; २०३ कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी
पुणे, 3 डिसेंबर (हिं.स.)। पश्चिम पुण्याचे प्रवेशद्वार असलेल्या चांदणी चौक–भूगाव रस्त्यावरील वाहतूक कोंडीतून अखेर पुणेकरांना दिलासा मिळणार आहे. या मार्गावर महापालिका तब्बल २०३ कोटी रुपये खर्चून भुयारी मार्ग तसेच उड्डाणपूल उभारणार आहे. भूगाव आणि भूकू
पुणे - चांदणी चौक ते भूगाव रस्त्यावरील कोंडी सुटणार; २०३ कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी


पुणे, 3 डिसेंबर (हिं.स.)। पश्चिम पुण्याचे प्रवेशद्वार असलेल्या चांदणी चौक–भूगाव रस्त्यावरील वाहतूक कोंडीतून अखेर पुणेकरांना दिलासा मिळणार आहे. या मार्गावर महापालिका तब्बल २०३ कोटी रुपये खर्चून भुयारी मार्ग तसेच उड्डाणपूल उभारणार आहे. भूगाव आणि भूकूम परिसरात मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाल्याने या भागातून लाखो वाहने शहरात येतात. तसेच या रस्त्याने हिंजवडी, घोटावडे, पिरंगूट, मुळशी व कोकणाकडे जाणाऱ्या वाहनांचीही मोठी संख्या आहे.

चांदणी चौकापासून पुढे हा दोन किलोमीटरचा रस्ता अत्यंत अरुंद असल्याने रोज प्रचंड कोंडीचा सामना करावा लागतो. ही कोंडी दूर करण्यासाठी या प्रकल्पास पालिकेच्या अंदाज समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आल्याची माहिती पालिकेच्या प्रकल्प विभागाचे प्रमुख दिनकर गोजारे यांनी दिली. या प्रकल्पासाठी ७४ टक्के जागा ताब्यात घेण्यात आली असून ८५ टक्के जागा ताब्यात आल्यावर कामाला सुरुवात करण्याचे नियोजन आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande