गोंडवाना विद्यापीठस्तरिय फुटबॉल स्पर्धेत सरदार पटेल महाविद्यालय विजयी
चंद्रपूर, 3 डिसेंबर (हिं.स.)। गोंडवाना विद्यापीठस्तरीय आंतर महाविद्यालयीन मुलांच्या फुटबॉल स्पर्धेत सरदार पटेल महाविद्यालय सुवर्णपदक पटकाविले आहे. गोंडवाना विद्यापीठस्तरीय आंतर महाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धा एम.जे.एफ.कॉलेज, आष्टी येथे आयोजित करण्यात
गोंडवाना विद्यापीठस्तरिय फुटबॉल स्पर्धेत सरदार पटेल महाविद्यालय विजयी


चंद्रपूर, 3 डिसेंबर (हिं.स.)।

गोंडवाना विद्यापीठस्तरीय आंतर महाविद्यालयीन मुलांच्या फुटबॉल स्पर्धेत सरदार पटेल महाविद्यालय सुवर्णपदक पटकाविले आहे. गोंडवाना विद्यापीठस्तरीय आंतर महाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धा एम.जे.एफ.कॉलेज, आष्टी येथे आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेकरिता चंद्रपूर व गडचिरोली परीक्षेत्रातील विविध महाविद्यालयांच्या संघानी सहभाग घेतला.

या फुटबॉल स्पर्धेत सरदार पटेल महाविद्यालयाच्या मुलांच्या संघाने विजेतापद पटकाविले. विजेतेपद खेचून आणण्याकरिता मुलांच्या संघात रवी राजभार , रोहित मंडल , सुमन सरकार , पंकज बावरे, जीत मंडल ,यश धकाते, अनुच येनूरकर, तेजस दमभारे, संस्कार बडकेलवार, चंदन मजुंबर, सुबोध गुरले, राजेश मंडल, अरीहंत यादव, गौरव झाडे यांनी आपल्या सुरेख खेळ, रणनीती व कौशल्याचे प्रदर्शन केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande