
गुरुपालटाचा पुण्यपर्वकाळ शुक्रवारी दुपारी ३.३९ मिनिटांपासून सायंकाळी ७.२१ मिनिटापर्यंत
छत्रपती संभाजीनगर, 3 डिसेंबर (हिं.स.)।
ज्योतिषशास्त्रामध्ये सर्वांत महत्त्वाचा आणि शुभ मानला जाणारा ग्रह म्हणजेच गुरू (बृहस्पती). ज्ञान, समृद्धी आणि आध्यात्मिक प्रगतीचा कारक असलेल्या या ग्रहाचा या वर्षातील तिसरा मोठा पालट होत आहे. शुक्रवारी सायंकाळी ५ वाजून ३० मिनिटांनी गुरू ग्रह मिथुन राशीत वक्रीय प्रवेश करत आहे. अशी माहिती छत्रपती संभाजी नगर येथील ज्योतिषी चार्य अनंत पांडव यांनी दिली आहे.
त्यांनी या संदर्भात माहिती देताना सांगितले की, मीन, वृश्चिक आणि कर्क राशींसाठी हा बदल थोडा क्लेशदायक असणार आहे, ज्यामुळे त्यांना गुरू ग्रहाची पीडा सहन करावी लागेल. मात्र, याच वेळी वृषभ, कर्क आणि धनु राशींसाठी गुरू ग्रहाचा सुवर्णपाद असल्याने त्यांना शुभ फळे मिळण्याची शक्यता आहे. या ग्रहपालटामुळे शिक्षण क्षेत्रात मोठे बदल होतील. सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार आणि जागतिक स्तरावर भारताची प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
गुरुपालटाचा पुण्यपर्वकाळ शुक्रवारी दुपारी ३.३९ मिनिटांपासून सायंकाळी ७.२१ मिनिटापर्यंत आहे. या वर्षी १४ मे रोजी गुरू ग्रहाने मिथुन राशीत प्रवेश केला होता. त्यानंतर १८ ऑक्टोबरला कर्क राशीत प्रवेश केला. त्यानंतर तिसऱ्यांदा प्रवेश होत आहे.
वृषभ, कर्क, धनू या राशींना गुरुग्रहाचा सुवर्णपाद आला असून याचे फळ चिंता आहे. मेष, कन्या आणि मकर या राशींना गुरू ग्रह रौप्य पादाने आला आहे. याचे फळ शुभ आहे. सिंह, वृश्चिक आणि मीन या राशींना ताम्रपदाने गुरू ग्रह आला आहे. याचे फळ श्रीप्राप्ती आहे. मिथुन, तुला आणिकुंभया राशींना लोहपदाने गुरू ग्रह आला आहे. याचे फळ कष्ट आहे.
मीन, वृश्चिक, कर्क राशीच्या जातकांनी रोज नित्यनेमाने गुरू ग्रहाचाः ॐ ग्रां ग्रीं ग्रौं सः गुरवे नमः एक माळ जप करावा. सुवर्ण, कास्य, पुष्कराज, हरभऱ्याची डाळ, साखर, पिवळे वस्त्र, पिवळी फुले दान करावीत. सिंह, तूळ, कुंभ या राशीच्या व्यक्तींना गुरूची कृपा प्राप्त होणार आहे, तर लोहपदाने आलेल्या राशींनी गुरू ग्रहाचा जप व दान करावे.
मीन राशीला चौथा, वृश्चिक राशीला आठवा आणि कर्क राशीला बारावा गुरू असणार आहे. या तिन्ही राशींना गुरुग्रहाची पीडा असणार आहे. मिथुन पहिला, मेष तिसरा, मकर राशीला सहावा, कन्या राशीला दहावा या राशींना देखील गुरू ग्रहाची कृपा कमी असणार आहे.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis