
नंदुरबार,, 3 डिसेंबर (हिं.स.) सशस्त्र सेना ध्वजदिन 2025 निधी संकलनाचा शुभारंभ शुक्रवार 12 डिसेंबर, 2025 रोजी सकाळी 10
वाजता नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार येथे आयोजित करण्यात आला असल्याची
माहिती, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, मेजर डॉ. निलेश पाटील यांनी एका
कळविली आहे. दरवर्षी 7 डिसेंबर हा सशस्त्र सेना ध्वज दिन म्हणून देशभरात साजरा केला जातो. सशस्त्र सेना ध्वज
दिनासापासून सर्व राज्यांमध्ये आजी, माजी सैनिकांच्या कल्याणासाठी जनतेकडून निधी गोळा करण्यात येते.
जनतेने सैनिकांच्या त्यागाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो. त्यानुसार नंदुरबार जिल्ह्याचा
सशस्त्र सेना ध्वजदिन 2025 निधी संकलनाचा शुभारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाचा शुभारंभ जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून या कार्यक्रमास
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, जिल्हा पोलीस अधिक्षक श्रवण दत्त एस, अपर
जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती आशा संघवी, जिल्हा उद्योग केंद्राचे
महाव्यवस्थापक संतोष गवळी, शिक्षणाधिकारी प्रविण अहिरे, (माध्यमिक), भानुदास रोकडे (प्राथमिक) यांची
प्रमुख उपस्थितीत राहणार आहे.
यावेळी जिल्ह्यातील वीरपत्नी, वीरमाता, वीरपिता यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच मागील वर्षी
उत्कृष्ट ध्वजदिन निधी संकलन केलेल्या अधिकारी व कर्मचारी यांना प्रोत्साहनपर सन्मानपत्र देवून गौरविण्यात
येणार आहे. तरी जिल्ह्यातीली माजी सैनिक व त्यांचे कुटुंबियांनी तसेच ध्वजदिन निधी संकलनाचे उत्कृष्ट कार्य
केलेल्या सर्व शासकीय, निमशासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी कार्यक्रमास उपस्थित रहावे. असे आवाहन
श्री. पाटील यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर