पुणे - ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी अनुभवली ‘नासा’ सफर
पुणे, 3 डिसेंबर (हिं.स.)। जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये शिक्षण घेणाऱ्या भावी अंतराळवीर व वैज्ञानिक विद्यार्थ्यांनी अमेरिकेतील नासा संस्थेला भेट दिली. बारा दिवसांच्या या अभ्यास दौऱ्याने ग्रामीण भागातील २५ विद्यार्थी अक्षरशः भारावून गेल
पुणे - ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी अनुभवली ‘नासा’ सफर


पुणे, 3 डिसेंबर (हिं.स.)। जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये शिक्षण घेणाऱ्या भावी अंतराळवीर व वैज्ञानिक विद्यार्थ्यांनी अमेरिकेतील नासा संस्थेला भेट दिली. बारा दिवसांच्या या अभ्यास दौऱ्याने ग्रामीण भागातील २५ विद्यार्थी अक्षरशः भारावून गेले. जिल्हा परिषद पुणे यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबवण्यात आला. महाराष्ट्रामध्ये विद्यार्थ्यांसाठी नासा संस्थेची भेट राबविणारी पुणे जिल्हा परिषद ही दुसरी उपक्रमशील जिल्हा परिषद ठरली आहे

.विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांच्या पुढाकारातून हा अभ्यास दौरा घेण्यात आला. शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना पहिल्यांदाच विमानात बसण्याचा अनुभव मिळाला. अमेरिकेतील महत्त्वाची वैज्ञानिक केंद्रे व अंतराळातील महत्त्वपूर्ण घडामोडींचा अभ्यास या दौऱ्यामुळे झाला. मुंबई- अबुधाबी- व्हाया वॉशिंग्टन असा प्रवास करत विद्यार्थी अमेरिकेत दाखल झाले. यावेळी पुण्यातील आयुका संस्थेचे शास्त्रज्ञ समीर दुरडे विद्यार्थ्यांसोबत उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande