
ललितप्रभजी महाराज व डॉ. मुनिश्री शांतिप्रियजी महाराज यांची उपस्थिती राहणार
परभणी, 3 डिसेंबर (हिं.स.)।
लोक कल्याणकारी सत्संग प्रवचन समिती व सकल जैन श्री संघ यांच्या संयुक्त विद्यमाने 3 आणि 4 डिसेंबर रोजी परभणीत आयोजित दोन दिवसीय दिव्य सत्संग व प्रवचनमालेच्या निमित्ताने बुधवारी सकाळी भव्य शोभायात्रा काढण्यात आली.
या शोभायात्रेत राष्ट्रसंत प.पू. श्री ललितप्रभजी महाराज व डॉ. मुनिश्री शांतिप्रियजी महाराज यांच्या विशेष उपस्थितीने भक्तिमय वातावरण निर्माण झाले. सकल जैन समाजातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि भाविकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.
शोभायात्रेची सुरुवात मध्यवस्तीतील सुभाष रोडवरील श्री गोडीजी पार्श्वनाथ मंदिरातून सकाळी 8.30 वाजता करण्यात आली. विविध धार्मिक घोषणा, आकर्षक सजावट व भक्तिमय वातावरणात शोभायात्रा मार्गस्थ झाली. हरिप्रसाद मंगल कार्यालयात या शोभायात्रेचा समारोप झाला.
दोन दिवसीय प्रवचनमाला हरिप्रसाद मंगल कार्यालयात 3 व 4 डिसेंबर रोजी सकाळी 9 ते 11.30 या वेळेत आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये ‘जो बदलेगा आपका जीवन’ या विषयावर राष्ट्रसंत प.पू. श्री ललितप्रभजी महाराज व डॉ. मुनिश्री शांतिप्रियजी महाराज यांचे प्रेरणादायी प्रवचन होणार आहे. अध्यात्म, नैतिक मूल्ये, सकारात्मकता व समतोल जीवनाचे महत्त्व यावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
या प्रवचनांचा लाभ घेण्यासाठी मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis