कात्रज उद्यानातील ऑनलाईन बुकिंगला नागरिकांचा चांगला प्रतिसाद
पुणे, 3 डिसेंबर (हिं.स.)।कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील ऑनलाईन तिकीट बुकिंग प्रणालीला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. ऑनलाईन बुकिंग सेवा सुरु झाल्यापासून म्हणजेच, गेल्या दोन वर्षांत या सुविधेद्वारे भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्
कात्रज उद्यानातील ऑनलाईन बुकिंगला नागरिकांचा चांगला प्रतिसाद


पुणे, 3 डिसेंबर (हिं.स.)।कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील ऑनलाईन तिकीट बुकिंग प्रणालीला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. ऑनलाईन बुकिंग सेवा सुरु झाल्यापासून म्हणजेच, गेल्या दोन वर्षांत या सुविधेद्वारे भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली आहे. १ जानेवारी २०२४ ते डिसेंबर २०२५ या कालावधीत सुमारे ५ लाख ४४ हजार ०६३ पर्यटकांनी उद्यानाच्या ऑनलाईन बुकिंगचा लाभ घेतला. या माध्यमातून उद्यान प्रशासनाला सुमारे २ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.उद्यानातील प्रत्यक्ष तिकीट खिडकीवरील गर्दी टाळण्यासाठी ऑनलाईन तिकीटिंगचा पर्याय सुरू करण्यात आला होता. या सुविधेमुळे पर्यटकांना पसंतीची वेळ निवडणे सोपे झाले, प्रवेशद्वारावरील रांगा आणि गोंधळात घट झाली असून डिजिटल पेमेंटमुळे बुकिंग प्रक्रिया जलद झाल्याचे सांगण्यात येत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande