जीव गेलेल्या मित्राच्या वेदनेतून जन्मला मोफत औषध वाटपाचा निर्णय - आ. देशमुख
सोलापूर, 3 डिसेंबर, (हिं.स.)। मोफत अन्नपूर्णा योजना, सामुदायिक विवाह सोहळे अशा अनेक सामाजिक उपक्रमांनंतर लोकमंगल फाउंडेशनकडून सर्वसामान्य आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांसाठी अत्यंत संवेदनशील आणि जिव्हाळ्याचा उपक्रम सुरू केला जात आहे. सोलापूर शहर
जीव गेलेल्या मित्राच्या वेदनेतून जन्मला मोफत औषध वाटपाचा निर्णय - आ. देशमुख


सोलापूर, 3 डिसेंबर, (हिं.स.)। मोफत अन्नपूर्णा योजना, सामुदायिक विवाह सोहळे अशा अनेक सामाजिक उपक्रमांनंतर लोकमंगल फाउंडेशनकडून सर्वसामान्य आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांसाठी अत्यंत संवेदनशील आणि जिव्हाळ्याचा उपक्रम सुरू केला जात आहे. सोलापूर शहर व जिल्ह्यातील गरीब, ज्येष्ठ नागरिक आणि सरकारी रुग्णालयातून औषधे न मिळालेल्या रुग्णांना मोफत औषध व गोळ्या वाटप करण्याची घोषणा संस्थापक अध्यक्ष आमदार सुभाष देशमुख यांनी केली. या उपक्रमाची सुरुवात १२ डिसेंबरपासून होणार आहे.एका हृदयस्पर्शी प्रसंगाची आठवण सांगताना आमदार सुभाष देशमुख भावूक होत म्हणाले,“माझा एक जिवलग मित्र केवळ औषधे मिळाली नाहीत म्हणून जीव गमावून बसला. अशा वेदनादायी घटना पुन्हा घडू नयेत, कोणाचंही घर उजाडू नये, म्हणून हा उपक्रम सुरु करण्याचा संकल्प केला आहे.”

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande