अमरावती रेल्वे स्थानक स्थलांतर प्रस्तावाविरोधात खा.बळवंत वानखडे आक्रमक 
अमरावती, 3 डिसेंबर (हिं.स.) अमरावतीचे लोकसभा खासदार बळवंत वानखडे यांनी अमरावती रेल्वे स्थानक हटवून इतरत्र स्थलांतर करण्याच्या प्रस्तावाचा तीव्र निषेध नोंदवत आक्रमक पवित्रा घेत आज केंद्रीय अश्विनी वैष्णव रेल्वेमंत्री यांना सविस्तर प्रत्यक्ष पत्र दे
अमरावती रेल्वे स्थानक स्थलांतर प्रस्तावाविरोधात खासदार बळवंत वानखडे आक्रमक   रेल्वेमंत्रींकडे उच्चस्तरीय चौकशी व स्थानक कायम ठेवण्याची मागणी


अमरावती, 3 डिसेंबर (हिं.स.)

अमरावतीचे लोकसभा खासदार बळवंत वानखडे यांनी अमरावती रेल्वे स्थानक हटवून इतरत्र स्थलांतर करण्याच्या प्रस्तावाचा तीव्र निषेध नोंदवत आक्रमक पवित्रा घेत आज केंद्रीय अश्विनी वैष्णव रेल्वेमंत्री यांना सविस्तर प्रत्यक्ष पत्र देऊन तत्काळ हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. विद्यमान स्थानक हटविण्याचा प्रस्ताव हा भूमाफियांना फायदा करून देण्यासाठी रचलेले कटकारस्थान असल्याच्या तक्रारींची स्वतंत्र उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशीही मागणी खासदार बळवंत वानखडे यांनी केली.खासदार बळवंत वानखडे यांनी पत्रात म्हटले आहे की, अमरावतीचे ब्रिटिशकालीन रेल्वे स्थानक हे शहराच्या आर्थिक, सामाजिक आणि औद्योगिक विकासाचे केंद्र असून ते हटविण्याचा कोणताही प्रस्ताव अमरावतीच्या जनभावनांविरुद्ध आहे. काही लोकप्रतिनिधींनी व्यापारी प्रकल्पासाठी रेल्वेची जमीन मुक्त करण्याच्या उद्देशाने स्थानक स्थलांतर पुढे रेटत असल्याचे गंभीर आरोप त्यांनी नोंदवले आहेत.

गेल्या काही महिन्यांत खासगी स्ट्रक्चरल ऑडिट, उड्डाणपुलाचे अचानक बंदकरणे, दुरुस्तीला विलंब, व परिणामी नागरिकांना निर्माण झालेला वाहतूक गोंधळ—या सर्व घडामोडी स्थानक हटविण्याचा मार्ग मोकळा करण्याचाच भाग असल्याचा संशय खासदारांनी व्यक्त केला.

खासदारांनी रेल्वेमंत्र्यांकडे केलेल्या प्रमुख मागण्या :

1. अमरावती रेल्वे स्थानक स्थलांतराचा प्रस्ताव तात्काळ रद्द करावा.

2. सदर प्रस्तावामागील प्रक्रिया, अधिकारी, सल्लागार व हितसंबंधांची स्वतंत्र उच्चस्तरीय चौकशी करावी.

3. वाहतुकीला महत्त्वाचा असलेला स्थानक चौक–राजकमल चौक उड्डाणपुलाचा दुरुस्तीकारभार तातडीने सुरू करावा.

4. अमरावती रेल्वे स्थानकाचा विस्तार, नवीन गाड्या, यार्ड विकास व प्रवासी सुविधांसाठी विशेष योजना मंजूर करावी.

5. रेल्वेची जमीन कमी करून कोणत्याही प्रकारचा व्यापारी प्रकल्प होणार नाही, याची लेखी हमी द्यावी.

या पूर्वी मा. नितीन गडकरी यांना खा. बळवंत वानखडे नी भेटू पत्र आणि चर्चा करून सदर पूल सेतूबंध योजने मधून राज्य शासनाकडून प्रस्ताव केंद्र सरकार कडे पाठवण्या करण्यासाठी विनंती केली होती.

या प्रकरणात केंद्रीय मंत्रालयाने तातडीने हस्तक्षेप करून जनभावनांचा आदर करावा, अशी अपेक्षा खासदारांनी व्यक्त केली आहे.खासदार बळवंत वानखडे यांनी स्पष्ट केले की अमरावतीचे नागरिक, उद्योजक, विद्यार्थी, व्यापारी आणि सामाजिक संस्थांचा एकमताने विरोध असून, स्थानकाला हात लावण्याचा कोणताही प्रयत्न जनतेला मान्य होणार नाही असे केंद्रीय रेल्वे मंत्री यांना प्रत्येक भेटू सांगितले. रेल्वे मंत्री वैष्णवी वैष्णव यांनी सुद्धा कोणत्याही परिस्थितीत रेल्वे स्थानक स्थलांतर होणार नाही याची ग्वाही दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande