
पुणे, 3 डिसेंबर (हिं.स.)। पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी काढण्यात आलेल्या प्रभागनिहाय आरक्षण साेडतीमध्ये प्रभाग क्रमांक १९ आणि ३० मधील आरक्षण बदलांसह अंतिम आरक्षण महापालिकेच्या निवडणूक विभागाने प्रसिद्ध केले आहे. आरक्षण सोडतीवर आलेल्या ७२ हरकती निवडणूक अधिकारी असलेले महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी फेटाळल्या आहेत.
महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी ११ नाेव्हेंबर राेजी आरक्षणाची सोडत काढण्यात आली. निवडणूक चार सदस्यीय पद्धतीने होणार असून ३२ प्रभाग आहेत. नगरसेवक संख्या १२८ जागा असून यामध्ये ६४ महिला आणि ६४ पुरूषांसाठी जागा राखीव आहेत. त्यात अनुसूचित जाती (एससी) दहा पुरुष दहा महिला अशा २०, अनुसूचित जमाती (एसटी) दोन महिला, एक पुरुष अशा तीन, नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) साठी १७ महिला १७ पुरुष अशा ३४ जागा आहेत, तर खुल्या गटातील ७१ जागांमध्ये महिलांसाठी ३५ जागा आरक्षित आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु