मतदान यंत्रावर खूणा केल्याचा पंढरपुरात भालके यांचा आरोप
सोलापूर, 3 डिसेंबर (हिं.स.)। पंढरपूर येथील नगराध्यक्ष, नगरसेवक पदासाठीच्या मतदान केंद्रावरील मतदान यंत्रावर खुणा केलेल्या अढळून येत आहेत. या खुणा असलेले बटन दाबा, असे भाजपच्या नेत्यांकडून मतदारांना सांगण्यात येत आहे. यामुळे प्रशासनाला हाताला धरून
मतदान यंत्रावर खूणा केल्याचा पंढरपुरात भालके यांचा आरोप


सोलापूर, 3 डिसेंबर (हिं.स.)। पंढरपूर येथील नगराध्यक्ष, नगरसेवक पदासाठीच्या मतदान केंद्रावरील मतदान यंत्रावर खुणा केलेल्या अढळून येत आहेत. या खुणा असलेले बटन दाबा, असे भाजपच्या नेत्यांकडून मतदारांना सांगण्यात येत आहे. यामुळे प्रशासनाला हाताला धरून मत चोरीचा प्रकार होत असल्याचा आरोप तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे नेते भगीरथ भालके यांनी केला.पंढरपुरातील 97 केंद्राना नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉ. प्रणिता व भगीरथ भालके यांनी भेट दिली. यावेळी काही ठिकाणच्या यंत्रावर पेनने खुणा केल्याचे आढळून आले,असे भालके यांचे म्हणणे आहे. त्यामुळे हे मशिन बदलण्यात यावे, अशी मागणी केली. पण याकडे दुर्लक्ष केले. यामुळे भाजपकडून प्रशासनाचा वापर करून मतचोरी होत असल्याचा आरोप भालके यांनी केला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande