
सोलापूर, 3 डिसेंबर (हिं.स.)। मंगळवेढा येथील कृषी उत्पन्न बाजार समिती मंगळवेढा संचालक मंडळ बरखास्त करून समितीच्या संचालक मंडळाचे अवैधरित्या घेतलेले निर्णयाची चौकशी करून घेतलेले निर्णय रद्द करून बाजार समितीवर प्रशासकाची नियुक्ती करून गाळे मूळ गाळेधारकांना परत अशा मागणीचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले. मुख्यमंत्री फडणवीस सांगोला दौऱ्यावर आले असता हे निवेदन आ.समाधान आवताडे यांच्या उपस्थितीत देण्यात आले या निवेदनावर गोपीनाथ माळी, विष्णुपंत मर्दा, अजित जगताप, सिद्धेश्वर माळी यांच्या सह्या आहेत.
या निवेदनावर म्हटले १९९५ साली कृषी उत्पन्न बाजार समितीकडे 20 हजार अनामत घेवून गाळे बांधकाम करून तुम्हाला व्यवसायासाठी दिले जाईल या अटीवर बाजार समितीने ९९ वर्षे करार केला जाईल असे सांगून प्रत्यक्षात ९ वर्षे चा करार केला यामध्ये ३५० रुपये आडे ठरले परत २०१२ साली भाडे १००० भाडे वाढ करून ५% दरवर्षी भाडे वाढ ठरले त्याप्रमाणे आम्ही देत राहिलो. २०१८ ला भाडेवाढ करताना त्यांनी कुणालाही लेखी करार दिला नाही. निबंधकाकडे लेखी तक्रार दिली असता त्यांनी सुनावणी ठेवून आम्हाला लेखी करार देण्याचे आदेश पारित केले तरीही शासनाचा महसूल बुडवण्याचे उद्देशाने आम्हला कुठलाही लेखी करार दिला नाही.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड