शिक्षकांच्या आंदोलनास नाशिक जिल्हा खासगी शिक्षण संस्था संघाचा पाठिंबा
नाशिक, 3 डिसेंबर (हिं.स.)। : राज्यातील विविध शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनांनी पुकारलेल्या राज्यभर शाळा बंद आंदोलनास नाशिक जिल्हा खासगी शिक्षण संस्था संघाने पाठिंबा जाहीर केला आहे, अशी माहिती मविप्रचे सभापती तथा संघाच्या जिल्हा कार्यकारिण
शिक्षकांच्या आंदोलनास नाशिक जिल्हा खासगी शिक्षण संस्था संघाचा पाठिंबा - जिल्हा कार्यकारिणी अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांची माहिती


नाशिक, 3 डिसेंबर (हिं.स.)। : राज्यातील विविध शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनांनी पुकारलेल्या राज्यभर शाळा बंद आंदोलनास नाशिक जिल्हा खासगी शिक्षण संस्था संघाने पाठिंबा जाहीर केला आहे, अशी माहिती मविप्रचे सभापती तथा संघाच्या जिल्हा कार्यकारिणी अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी पत्रकाद्वारे प्रसिद्धीस दिली आहे. राज्य शासनाने घेतलेल्या विविध अन्यायकारक निर्णयाविरुध्द राज्यातील विविध शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनांनी शुकवार दिनांक 05 डिसेंबर 2025 रोजी राज्यभर शाळा बंद आंदोलन घोषित केले आहे. सदर आंदोलन यशस्वी करण्याकरिता राज्यभरातील सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य शिक्षणसंस्था महामंडळाने घेतलेला आहे. या निर्णयास नाशिक जिल्हा खासगी शिक्षण संस्था संघानेही जाहीरपणे पाठिंबा दर्शविला असल्याचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी म्हटले आहे.या पत्रकावर कार्याध्यक्ष माजी खासदार विजय पाटील, उपाध्यक्ष कोंडाजी आव्हाड, सहकार्यवाह . विजयराव गव्हाणे, विधी सल्लागार ॲड. नितीन ठाकरे जिल्हा कार्यकारिणी अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, उपाध्यक्ष सुनिल चोपडा, सचिव बाळासाहेब ढोबळे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande