शाहीस्नान नाही, पर्वणीस्नानच!' फलहारी महाराजांची मागणी
नाशिक, 3 डिसेंबर (हिं.स.)। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात साधू-संतांच्या स्नानाविषयी वापरल्या जाणाऱ्या शब्दांवर आता धार्मिक नेतृत्वाकडून स्पष्ट भूमिका समोर आली आहे. पारंपरिक शाहीस्नान या शब्दाऐवजी पर्वणीस्नान असा उल्लेख करावा, अशी मागणी महंत रामनारायण
शाहीस्नान नाही, पर्वणीस्नानच!' फलहारी महाराजांची मागणी


नाशिक, 3 डिसेंबर (हिं.स.)।

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात साधू-संतांच्या स्नानाविषयी वापरल्या जाणाऱ्या शब्दांवर आता धार्मिक नेतृत्वाकडून स्पष्ट भूमिका समोर आली आहे. पारंपरिक शाहीस्नान या शब्दाऐवजी पर्वणीस्नान असा उल्लेख करावा, अशी मागणी महंत रामनारायणदास फलहारी महाराज यांनी केली.

महंतांनी सांगितले की, 'शाहीस्नान' हा शब्द मुगलकालीन राजवटीत प्रचलित झाला. हा शब्द ऐतिहासिकदृष्ट्या बरोबर असला तरी पवित्र परंपरेच्या दृष्टिकोनातून हा शब्द अनुकूल नाही. पूर्वी शाहीस्नान असे म्हणून उल्लेख करण्यात येत असे, तर सध्या प्रशासन 'अमृतस्नान' हा शब्द वापरत आहे. परंतु आपण महाराष्ट्रात राहतो. येथील धार्मिक परंपरा आणि संकल्पना वेगळ्या आहेत. त्यामुळे साधू-संतांच्या पवित्र स्नानाला 'पर्वणीस्नान' या नावानेच गौरव करावा.

यावेळी पर्वणी काळाचा संदर्भफलहारी महाराजांनी ऐतिहासिक पार्श्वभूमी अधोरेखित करताना सांगितले की, आपण पर्वणी काळात राहतो आणि या काळात या स्नानाला विशेष आध्यात्मिक महत्त्व आहे. फियास्त काळापासूनच या सोहळ्याकडे भक्तीभावाने पाहिले जाते. त्यामुळे या पवित्र स्नानाला पर्वणी स्नान अशीच ओळख दिली गेली पाहिजे. तसेच जुन्या भाविकांच्या मतांनाही त्यांनी अधोरेखित केले. त्यांच्या म्हणण्यानुसार, सिंहस्थ कुंभमेळ्यात सर्वात महत्त्वाचा सोहळा म्हणजे साधू, महंतांचे पवित्र स्नान. अनेक दशकांपासून या स्नानाला पर्वणी स्नान म्हणूनच भक्तजन संबोधत आले आहेत. तसेच यावेळी फलहारी महाराज म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी 'अमृतस्नान' साधू-महंत असा उल्लेख केला आहे. परंतु धार्मिक भावनेचा मान राखून सरकारी कागदपत्रे, प्रसारमाध्यमे आणि अधिकृत घोषणांमध्येही 'पर्वणीस्नान' हा शब्द वापरला जावा, अशी मागणी आम्ही त्यांच्याकडे केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande