पिंपरी चिंचवड महापालिकेकडून राडारोडा व्यवस्थापन व कामगार सुरक्षेबाबत जनजागृती
पुणे, 3 डिसेंबर (हिं.स.)।पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ब क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने प्रभाग क्रमांक १६ येथील किवळे भागातील शुभारंभ क्लारा कन्स्ट्रक्शन साईटवर बांधकाम राडारोडा व्यवस्थापन व कामगार सुरक्षा या दोन महत्त्वपूर्ण विषयांवर जनजागृती करण्यात
PCMC


पुणे, 3 डिसेंबर (हिं.स.)।पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ब क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने प्रभाग क्रमांक १६ येथील किवळे भागातील शुभारंभ क्लारा कन्स्ट्रक्शन साईटवर बांधकाम राडारोडा व्यवस्थापन व कामगार सुरक्षा या दोन महत्त्वपूर्ण विषयांवर जनजागृती करण्यात आली. महापालिका अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली व आरोग्य विभागाचे उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांच्या अधिपत्याखाली हा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी पिंपरी चिंचवड शहरात बांधकामातून निर्माण होणारा राडारोडा उघड्यावर टाकू नये, तो महापालिकेच्या राडारोडा प्रकल्पात जमा करावा, याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. महापालिकेने राडारोडा संकलनासाठी स्वतंत्र व्यवस्था उपलब्ध करून दिली असून नागरिक व बांधकाम व्यावसायिकांनी १८००१२०३३२१२६ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधून बांधकाम राडारोडा संकलनासाठी संपर्क करावा, असे आवाहन देखील यावेळी करण्यात आले. बांधकाम कामगारांच्या सुरक्षेसाठी बांधकामस्थळी मास्क, सेफ्टी जॅकेट, सेफ्टी शूज अशा सुरक्षासाधनांचा योग्य वापर अनिवार्य असल्याचे विशेषत्वाने यावेळी सांगण्यात आले. या उपक्रमातून कामगारांना सुरक्षित कामकाजाचे नियम, अपघात टाळण्याच्या पद्धती आणि सुरक्षेची मूलभूत तत्त्वे समजावण्यात आली.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande