चामुंडी देवी अवमान प्रकरणी अभिनेता रणवीर सिंह विरोधात पोलीसात तक्रार !
मुंबई, 3 डिसेंबर (हिं.स.) - गोव्यात नुकत्याच पार पडलेल्या ५६ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (इफ्फी) समारोप सोहळ्यात बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह यांनी ‘कांतारा – चॅप्टर १’ या कन्नड चित्रपटातील देवीच्या अवताराची रंगमंचावर नक्कल केली आण
तक्रार


कांतारा चॅप्टर - १ चे पोस्टर


अभिनेता रणवीर सिंह


तक्रार पत्र


मुंबई, 3 डिसेंबर (हिं.स.) - गोव्यात नुकत्याच पार पडलेल्या ५६ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (इफ्फी) समारोप सोहळ्यात बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह यांनी ‘कांतारा – चॅप्टर १’ या कन्नड चित्रपटातील देवीच्या अवताराची रंगमंचावर नक्कल केली आणि चित्रपटात दाखवलेले पवित्र दैवत कोटीतुलू समाजातील ‘श्री चामुंडी देवी’ला ‘फिमेल घोस्ट’ (महिला भूत), असे संबोधले आहे. या प्रकरणी अभिनेता रणवीर सिंह यांच्यावर चामुंडी देवीचा अवमान करून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणी गुन्हा नोंदवावा, अशी मागणी करणारे निवेदन हिंदु जनजागृती समितीने पणजी पोलीस ठाण्यात दिले आहे.

या वेळी पणजी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक साहिन शेट्ये यांच्याकडे हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रमोद तुयेकर आणि श्री. दिलीप शेट्ये यांनी हे निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, ‘श्री चामुंडी देवी’ हे कर्नाटकातील तुलू समाजाचे आराध्य आणि कुलदैवत आहे. देवीला ‘भूत’ म्हणणे आणि तिच्या दैवी अवताराची करमणुकीच्या हेतूने सर्वांसमोर नक्कल करणे, ही अत्यंत अवमानकारक आणि हिंदु समाजाच्या श्रद्धास्थानावर आघात करणारी कृती आहे. या घटनेमुळे समाजात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे सार्वजनिक शांतता बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या प्रकरणी रणवीर सिंह यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम २९९, १९४, ३०२ नुसार धार्मिक भावना जाणूनबुजून दुखावणे आणि समाजात वैरभाव पसरवणे या गुन्ह्यांशी संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदवून सखोल चौकशी करावी.

‘इफ्फी’चे आयोजक आणि संबंधित अधिकारी यांनीही भविष्यात अशा कार्यक्रमांत कोणत्याही धर्माच्या देवतांचा अवमान होऊ नये, यासाठी स्पष्ट आचारसंहिता सिद्ध करावी आणि त्याची काटेकोर कार्यवाही करावी. हिंदु जनजागृती समितीने ‘रणवीर सिंह यांनी सार्वजनिकरित्या श्री चामुंडी देवीची क्षमा मागावी आणि पुढे अशा प्रकारचे वक्तव्य अथवा अभिनय न करण्याची हमी द्यावी’, अशीही अपेक्षा व्यक्त केली आहे. सर्व हिंदु बांधवांना कायद्याचा मार्ग अवलंबून शांततामय, संयमी; पण ठामपणे या अवमानाचा निषेध नोंदवण्याचे आवाहनही समितीने केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande