
सोलापूर, 3 डिसेंबर (हिं.स.)। प्रदूषण नियंत्रण विभागाच्या मुख्यालयाकडून पालिकेला चाळीस कोटी 62 लाखांचा निधी मिळाला आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून प्रदूषण नियंत्रणासाठीच्या कायद्यांची अंमलबजावणी करतांना उद्योगांकडून प्रदूषण उपकर गोळा करते. याच उपकरातून सरकारकडे निधी जमा होतो. प्रदूषण नियंत्रणाशी संबंधित सांडपाणी प्रक्रियांसह झाडे लावणे, रस्ते साफ करणे यासह अन्य कामांसाठी प्रदूषण नियंत्रण मंडळ विशिष्ट योजनांमधून निधीद्वारे पालिकेला मदत करते. याचा अप्रत्यक्षपणे महापालिकेला फायदा होतो.मंडळाकडून राज्यातील विविध उद्योगांकडून उपकराची वसुली केली जाते. प्रदूषण नियंत्रण मंडळ, पाणी उपकर अधिनियम, 1977 नुसार उद्योगांकडून उपकर गोळा करते. या करातून मिळालेली रक्कम प्रदूषण नियंत्रण आणि प्रदूषणाच्या प्रतिबंधासाठी वापरते. जलशुद्धीकरण केंद्रे किंवा घनकचरा व्यवस्थापनासाठी, प्रदूषण नियंत्रण मंडळ थेट महापालिकेच्या योजनांमध्ये व प्रकल्पांसाठी आर्थिक किंवा तांत्रिक मदत करत असते. प्रदूषण नियंत्रणाच्या कायद्यांचे उल्लंघन केलेल्या संबंधित उद्योगांंना दंड आकारते. याच दंडाच्या रकमेचा काही भाग प्रदूषण नियंत्रणाचे उपक्रम राबवण्यासाठी वापरला जातो.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड