प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षकांचा शुक्रवारी पुण्यात मोर्चा
पुणे, 3 डिसेंबर (हिं.स.)।राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळा, शिक्षक, विद्यार्थी आणि शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी शुक्रवारी पुणे येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी सहभागी होण
प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षकांचा शुक्रवारी पुण्यात मोर्चा


पुणे, 3 डिसेंबर (हिं.स.)।राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळा, शिक्षक, विद्यार्थी आणि शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी शुक्रवारी पुणे येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी सहभागी होणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संयुक्त महामंडळाचे विभागीय अध्यक्ष केरभाऊ ढोमसे यांनी दिली.

जुन्नर येथे मोर्चाच्या अनुषंगाने जुन्नर तालुका प्राथमिक, माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर संघटना समन्वय समितीच्या सहविचार सभेत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी तबाजी वाघदरे, खंडेराव ढोबळे, पंकज घोलप, अशोक काकडे, निलेश काशीद, राजेश दुर्गुडे, संदीप दातीर, वैभव सदाकाळ, रमेश ढोमसे, प्रभाकर दिघे, संतोष हांडे, विश्वास भालिंगे आदी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande