पुणे : होर्डिंग शुल्क दरवाढीचा ठराव शासनाकडून रद्द
पुणे, 3 डिसेंबर (हिं.स.)। पुणे महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाने २०२२ मध्ये होर्डिंग शुल्क निश्‍चिती करून उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न सुरू केले होते. पण राज्य सरकारने महापालिकेचा हा ठराव रद्द केल्याने महापालिकेला झटका बसला आहे. पुढील १५ दिवसात होर्डिं
पुणे : होर्डिंग शुल्क दरवाढीचा ठराव शासनाकडून रद्द


पुणे, 3 डिसेंबर (हिं.स.)। पुणे महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाने २०२२ मध्ये होर्डिंग शुल्क निश्‍चिती करून उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न सुरू केले होते. पण राज्य सरकारने महापालिकेचा हा ठराव रद्द केल्याने महापालिकेला झटका बसला आहे. पुढील १५ दिवसात होर्डिंगसाठीचे शुल्क निश्‍चित करावे लागणार आहेत. दरम्यान, हे दर निश्‍चित होईपर्यंत नवीन परवाने देण्यावर स्थगिती आलेली आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी दिली.पुणे शहरात जाहिराती करण्यासाठी प्रमुख चौकात, रस्त्यांवर मोठेच्या मोठे होर्डिंग उभे करण्यात आलेले आहेत. राज्य सरकारने त्यासाठी नियमावली केलेली असली तरी तिची पायमल्ली करून महापालिका प्रशासनाच्या आशीर्वादाने चुकीचे होर्डिंग उभे केले आहेत. त्यावर कारवाई केली जात नाही. त्यातच शुल्क आकारणीवरून महापालिकेचा आकाशचिन्ह विभाग आणि होर्डिंग व्यावसायिक यांच्यात वाद होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande