नालासोपारा येथील राजेश ढगे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश
मुंबई, 3 डिसेंबर, (हिं.स.)। नालासोपारा येथील माजी नगरसेवक राजेश ढगे, जागृती महिला मंडळ अध्यक्ष रसिका ढगे यांच्यासह 3 माजी नगरसेविका आणि शेकडो कार्यकर्त्यांनी बुधवारी भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सर्वांचे
नालासोपारा येथील राजेश ढगे यांच्यासह अनेक माजी नगरसेवक व शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश


मुंबई, 3 डिसेंबर, (हिं.स.)। नालासोपारा येथील माजी नगरसेवक राजेश ढगे, जागृती महिला मंडळ अध्यक्ष रसिका ढगे यांच्यासह 3 माजी नगरसेविका आणि शेकडो कार्यकर्त्यांनी बुधवारी भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सर्वांचे पक्षात स्वागत केले. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमाला आ. राजन नाईक, जिल्हाध्यक्ष प्रज्ञा पाटील, मुख्यालय प्रभारी रविंद्र अनासपुरे, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन, माजी जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटील, मनोज बारोट आदी उपस्थित होते.

यावेळी प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'गतिमान आणि पारदर्शक' नेतृत्वावर विश्वास ठेवून या परिसराच्या विकासासाठी या सर्वांनी भाजपा मध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही आणि भाजपा त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील. पायाभूत सुविधा विकासासाठी केंद्र, राज्य आणि महापालिका येथे एकविचाराचे सरकार असले तर विकास वेगाने होतो. वसई - विरार परिसरातील वाहतूक कोंडी संपवण्यासाठी कोस्टल रोड विरार पर्यंत न्यायचा आहे, हे काम केवळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारच करू शकते. वाढवण बंदर, विमानतळ यामुळे नागरी सुविधांचे जाळे निर्माण करण्यासाठी पालिकेची सत्ता योग्य व सक्षम हातात जाणे गरजेचे आहे. विरोधकांच्या भावनिक आवाहनांना बळी पडू नका ही महापालिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दत्तक म्हणून द्या आणि परिसराचा कायापालट वेगाने झालेला पहा असेही श्री. चव्हाण यांनी नमूद केले.

यावेळी आ. राजन नाईक म्हणाले की, 35 वर्षांपासून या परिसराचे असलेले प्रश्न सोडवायचे असतील तर पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सारख्या आश्वासक नेतृत्वाची गरज आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारच्या हातात पालिकेची सत्ता देणे गरजेचे आहे हे ओळखून आज या सर्व अनुभवी कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. आत्तापर्यंत चार रेल्वे ओव्हरब्रीज, रिंगरूट, रस्ते काँक्रीटीकरण तसेच अनेक विकासकामांसाठी भरघोस निधी सरकारने दिला आहे. भविष्यात या सर्व अनुभवी मंडळींचा फायदा भाजपाला होईल तसेच प्रत्येकाचा योग्य सन्मान पक्षात राखला जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली.

भाजपामध्ये प्रवेश केलेल्यांमध्ये युवा विकास आघाडी चे मिलिंद सासवडकर,माजी नगरसेविका सुषमा दिवेकर, माजी परिवहन सभापती कल्पक पाटील, वॉर्ड अध्यक्ष प्रतिभा वर्तक, माजी नगरसेविका ज्योती राऊत, माजी नगरसेविका ॲड. माया चौधरी, विनीत जैन, स्वामी समर्थ मठ बोळींजचे राजेश राऊत, वसई विरार जिल्हा उपाध्यक्ष काँग्रेसचे मेहुल मोने, दिव्या सोलंकी, श्रद्धा भोसले, वॉर्ड अध्यक्ष संतोष मेरतीया आदींचा समावेश आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande