
रत्नागिरी, 3 डिसेंबर, (हिं. स.) : सीए इन्स्टिट्यूटच्या रत्नागिरी शाखेतर्फे हॉटेल विवेक येथे चर्चासत्र घेण्यात आले. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला.यावेळी पीएफ आणि ईएसआयसी तसेच नवीन कामगार कायदे, ऑडिटिंग स्टँडर्डस् आणि जीएसटी कायद्यातील नवीन महत्त्वाच्या तरतुदी या विषयावर वक्त्यांनी मार्गदर्शन केले.
प्रास्ताविकामध्ये शाखेचे अध्यक्ष सीए मंदार जोशी यांनी वरील विषयांचे महत्त्व सांगितले. प्रथम सत्रात सीए अक्षय जोशी यांनी पीएफ आणि ईएसआयसी तसेच नवीन कामगार कायदे यावर प्रकाश टाकला. द्वितीय सत्रात सीए प्रसाद आचरेकर यांनी ऑडिटिंग स्टँडर्डस् आणि ऑडिट डॉक्युमेंटेशनचे महत्त्व याबद्दल मार्गदर्शन केले. तृतीय सत्रात अॅड. अभिजित बेर्डे यांनी जीएसटी कायद्यातील नवीन महत्त्वाच्या तरतुदी याबद्दल मार्गदर्शन केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी