नगरपालिका निवडणूक प्रक्रिया पूर्ण होताच समीर भुजबळ लागले कामाला
येवला, 3 डिसेंबर (हिं.स.)। येवला नगरपालिका निवडणुकीची मतदान प्रक्रिया पूर्ण होताच दुसऱ्याच दिवशी सकाळपासून माजी खासदार समीर भुजबळ यांनी लगेचच कामाला लागले आहे. आज समीर भुजबळ यांनी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ य
नगरपालिका निवडणूक प्रक्रिया पूर्ण होताच समीर भुजबळ लागले कामाला


येवला, 3 डिसेंबर (हिं.स.)। येवला नगरपालिका निवडणुकीची मतदान प्रक्रिया पूर्ण होताच दुसऱ्याच दिवशी सकाळपासून माजी खासदार समीर भुजबळ यांनी लगेचच कामाला लागले आहे. आज समीर भुजबळ यांनी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून येवला शहर व परिसरात सुरू असलेल्या विविध प्रकल्पांच्या कामाची पाहणी केली. यावेळी येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, उपाध्यक्ष दत्ता निकम, जलचिंतन सेलचे जिल्हाध्यक्ष मोहन शेलार, समाधान जेजुरकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. माजी खासदार समीर भुजबळ यांनी येवला नगरपालिकेचा कचरा डेपो आणि बायोमायनिंग प्रकल्पाची पाहणी केली. तसेच येवला शिवसृष्टी कामाची त्याचबरोबर तालुका क्रीडा संकुल व महात्मा फुले नाट्यगृह नूतनीकरण कामाची पाहणी केली. ही सुरू असलेल्या कामे नियोजित वेळेत पूर्ण करण्यात यावी अशा सूचना माजी खासदार समीर भुजबळ यांनी संबंधिताना दिल्या आहे. येवला शहरातील घनकचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी वडगाव बल्हे या ठिकाणी कार्यान्वित असलेल्या घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाची आज पाहणी केली. यावेळी येथील कामाची माहिती घेतली, येथील महिला कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. तसेच दैनंदिन संकलित होणाऱ्या कचऱ्यावर गतिमान पद्धतीने प्रक्रिया करण्याच्या अनुषंगाने संबंधितांना सूचना केल्या.'स्वच्छ, सुंदर व कचरामुक्त येवला शहर' या संकल्पनेअंतर्गत मा. छगनराव भुजबळ साहेबांच्या माध्यमातून विविध प्रकल्प व प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. शहर स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिले जात असून नगरपरिषदेकडील घंटागाड्यांची संख्या वाढविण्याचे नियोजित आहे. तसेच प्लास्टिकच्या वापरावर निर्बंध आणून प्लास्टिक मुक्त शहर करण्याचेही नियोजन आहे. -

--------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande