
नाशिक, 3 डिसेंबर (हिं.स.)। - टीईटी सक्तीच्या निर्णयाविरोधात जिल्ह्यातील सर्व - शिक्षक व शिक्षकेतर संघटना एकवटल्या असून, येत्या दि. ५ - डिसेंबर रोजी नाशिक येथे भव्य आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात - आले आहे. या मोर्चासाठीचा संयुक्त - जाहीर पाठिंबा निवेदनाच्या माध्यमातून शिक्षणाधिकारी (माध्यमिक) कार्यालयाला सर्व - संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या - उपस्थितीत देण्यात आला. राज्य सरकारने कार्यरत व - जुन्या शिक्षकांसाठी टीईटी परीक्षा सक्तीची केल्यानंतर निर्माण झालेल्या असंतोषाचे पडसाद जितल्ह्यात उमटत आहेत. या अन्यायकारक निर्णयाच्या रद्दबातलतेसाठी सकाळी ११ वाजता गोल क्लब मैदानावरून मोर्चा निघणार असून, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, तसेच शिक्षकेतर कर्मचारी सामूहिक रजेवर जाऊन मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. जिल्हा परिषद, नगरपालिका, तसेच खासगी शैक्षणिक संस्थांतील कर्मचारीही मोर्चात सहभागी होणार असल्याने व्यापक आंदोलनाची चिन्हे दिसत आहेत. सामूहिक रजेसंदर्भातील निवेदन उपशिक्षणाधिकारी नरेश पाटील यांच्या स्वाधीन करण्यात आले
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV