
नाशिक, 3 डिसेंबर (हिं.स.)।
: पर्यावरणप्रेमी महामंडलेश्वर किन्नर आखाड्याच्या डॉ. पायल नंदगिरी यांच्या वतीने तपोवनातील प्रस्तावित वृक्षतोडीचा तीव्र विरोध करण्यात आला.
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर साधुग्रामच्या नावाखाली तपोवनातील वृक्ष तोडण्याचा महापालिकेचा निर्णय शासनाने रद्द करावा, या मागणीसाठी महामंडलेश्वर किन्नर आखाडा तथा जुना आखाडा, शक्तिपीठेश्वर नीर पर्वत पिठाधीश त्र्यंबकेश्वर, सप्तशृंगी गड व मंगलमुखी सेवाभावी ट्रस्ट यांच्या वतीने तपोवनात अनोखे आंदोलन करण्यात आले. तपोवनातील शान वाचली पाहिजे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. आंदोलनात लहानग्यांसह मोठे व्यक्तीही सहभागी झाले होते. यावेळी सावली वृद्धाश्रमाच्या संचालिका अनिता डगळे यांनी तीव्र शब्दांत वृक्षतोडीला विरोध केला. यावेळी 'झाडे वाचवा, तपोवन वाचवा' अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV