पुणे - मतदार यादीवर ९ हजार हरकतींचा पाऊस
पुणे, 3 डिसेंबर, (हिं.स.)। पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीवर हरकत घेण्यासाठी अजून दोन दिवस शिल्लक आहेत. आजपर्यंत प्रारूप मतदार यादीवर तब्बल ९ हजार ३७० हरकती दाखल झाल्या आहेत. ही संख्या दोन दिवसात मोठ्याप्रमाण
Voter


पुणे, 3 डिसेंबर, (हिं.स.)। पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीवर हरकत घेण्यासाठी अजून दोन दिवस शिल्लक आहेत. आजपर्यंत प्रारूप मतदार यादीवर तब्बल ९ हजार ३७० हरकती दाखल झाल्या आहेत. ही संख्या दोन दिवसात मोठ्याप्रमाणात वाढण्याची शक्यता आहे.

महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी जाहीर झाली आहे. शहरात एकूण ३५ लाख ५१ हजार ४६९ मतदार आहेत. त्यामध्ये ३ लाख ४४६ नावे दुबार असल्याचे समोर आले आहेत.४१ प्रभागांपैकी १० प्रभागांमध्ये एक लाखांहून अधिक मतदार असून, मतदारसंख्या प्रचंड वाढल्याने उमेदवारांपुढे त्यांच्यापर्यंत पोचण्याचे मोठे आव्हान आहे. इच्छुक उमेदवारांनी प्रारूप मतदार याद्या तपासण्यासाठी घेतल्यानंतर त्यात प्रचंड त्रुटी असल्याचे समोर आले. त्याविरोधात सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी हरकती नोंदविल्या, पण त्यासाठी केवळ आठ दिवसांची मुदत असल्याने हा वेळ अपुरा पडत होता. त्यामुळे आता हरकती नोंदविण्यासाठी ३ डिसेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. त्यानंतर हरकती नोंदविण्याची गती वाढली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande