मतदान झाले : उमेदवार, मतदार संभ्रमात; तर्कवितर्काना उधाण
अमरावती, 3 डिसेंबर (हिं.स.) नगरपरिषद निवडणुकीसाठी मंगळवारी झालेल्या मतदानाला मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यत मतदान सुरळीत सुरू होते, तर त्यानंतर अनेक मतदान केंद्रांवर मतदारांच्या लांबच लांब रांगा दिसून आल्या.
मतदान झाले : उमेदवार, मतदार संभ्रमात; तर्कवितर्काना उधाण


अमरावती, 3 डिसेंबर (हिं.स.)

नगरपरिषद निवडणुकीसाठी मंगळवारी झालेल्या मतदानाला मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यत मतदान सुरळीत सुरू होते, तर त्यानंतर अनेक मतदान केंद्रांवर मतदारांच्या लांबच लांब रांगा दिसून आल्या. मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली असली तरी निकालाबाबत उमेदवारांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला असून, शहरात तर्कवितर्काना सुरुवात झाली आहे.कोणाचे पारडे जढ़, कोण जिंकणार, कोण हरणार, याबाबत मतदारांमध्येहीचर्चा रंगू लागल्या आहेत. या निवडणुकीत प्रभाग क्रमांक ७ 'ब'मध्ये मतदान स्थगित करण्यात आले होते. त्यामुळे एक नगराध्यक्ष आणि २५ नगरसेवकपदांसाठी मतदान झाले. पर ज्यांदा मतदान करणाऱ्या तरुण मतदारांचा उत्साह विशेषतः लक्षवेधी ठरला. नगराध्यक्षपदासाठी काँग्रेस आणि भाजपामध्ये चुरशीची लढत बघायला मिळाली, तर शिंदेसेनेच्या उमेदवाराचीही मतदारांमध्ये चर्चा रंगल्याचे दिसले. बहुतेक प्रभागांत काँग्रेस-भाजपाची सरळ लढत तर काही प्रभागांमध्ये शिंदेसेना आाणि उद्धवसेनेच्या उमेदवारांनी आव्हान उभे केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande