
पुणे, 3 डिसेंबर (हिं.स.)। जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) विभागामार्फत जागतिक शौचालय दिनानिमित्ताने जिल्ह्यात ‘हमारा शौचालय, हमारा भविष्य’ या विशेष मोहिमेला सुरुवात केली आहे. मोहीम १० डिसेंबरपर्यंत राबविण्यात येणार आहे . या मोहिमेदरम्यान शाळा, ग्रामसभा, स्वयंसहाय्य गट, युवक मंडळे, निवृत्त सैनिक आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्या सहभागातून स्वच्छता, आरोग्य, सुरक्षित मलनिस्सारण आणि शौचालय वापराबाबत जनजागृती केली जाणार आहे.
जिल्हा स्तरावर उत्तम देखभाल व सुशोभीकरण करणाऱ्या गावांचा विशेष सत्कार केला जाणार आहे. तर सार्वजनिक शौचालय व्यवस्थापनात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींचे सरपंच व पंचायत अधिकाऱ्यांचा १० डिसेंबर २०२५ रोजी गौरव केला जाणार आहे. या अभियानात सर्व ग्रामपंचायतींनी सक्रिय सहभाग नोंदवावा,’’ असे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी अप्पासाहेब गुजर यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु