पंचायत समिती अंतर्गत चुकीची कामे करू नका -आमदार सुरेश धस
आष्टी तालुक्यातील सरपंच ग्रामसेवक रोजगार सेवक यांची बैठक बीड, 30 डिसेंबर (हिं.स.)। आष्टी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार सुरेश धस यांच्या उपस्थितीत पंचायत समिती कार्यालय, आष्टी येथे आष्टी तालुक्यातील सर्व सरपंच, ग्रामसेवक, रोजगार सेवक व प्रमुख
बीड


आष्टी तालुक्यातील सरपंच ग्रामसेवक रोजगार सेवक यांची बैठक

बीड, 30 डिसेंबर (हिं.स.)। आष्टी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार सुरेश धस यांच्या उपस्थितीत

पंचायत समिती कार्यालय, आष्टी येथे आष्टी तालुक्यातील सर्व सरपंच, ग्रामसेवक, रोजगार सेवक व प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली.

पंचायत समिती अंतर्गत सार्वजनिक स्वरूपाची तसेच वैयक्तिक स्वरूपाची कामे याबाबत अधिकारी, अभियंते व ऑपरेटर यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर मंजुरी देताना तसेच नवीन कामे सुरू करताना अस्ताव्यस्त व चुकीचे नियोजन झाल्याचे दिसून आले. जास्तीच्या मंजुरी व तांत्रिक मान्यता दिल्या गेल्यामुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणावर गोंधळ निर्माण झाल्याचे स्पष्ट दिसते.

या संदर्भात तातडीची बैठक घेऊन गटविकास अधिकारी श्री. गोकुळ बागलाने यांच्यासह ग्रामसेवक, रोजगार सेवक व सरपंच यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या. राज्य शासनाने रोजगार हमी योजनेअंतर्गत सार्वजनिक व वैयक्तिक लाभांच्या कामांसाठी घालून दिलेल्या अटी व बंधनांचे काटेकोर पालन करणे आवश्यक असून, त्या अटींच्या बाहेर जाऊन कोणीही काम केले किंवा चुकीची कार्यपद्धती अवलंबली तर संबंधितांना सुनावले जाईल, असा इशारा दिला.

यासोबतच ग्रामीण भागातील नागरिकांच्या विविध योजना पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारची रोजगार हमी योजना ही अत्यंत महत्त्वाची व नाविन्यपूर्ण योजना आहे. या योजनेची योग्य अंमलबजावणी होणे आणि योग्य लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळणे आवश्यक आहे. यासाठी आठवड्यातील एक दिवस पंचायत समिती कार्यालयात आढावा बैठक घेऊन शेतकरी व सर्वसामान्य लाभार्थ्यांकडून आलेल्या तक्रारींचे निरसन करण्यासाठी योग्य ती धोरणे राबविण्याचा शब्द सर्वांना दिला.

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande