बीडमध्ये घरकुल योजनेतील लाभार्थींना ५ ब्रास वाळू मोफत देण्यात येणार
बीड, 30 डिसेंबर (हिं.स.)। घरकुल योजनेतील लाभार्थींना ५ ब्रास वाळू मोफत देण्यात येणार आहे. त्यासाठी बीड जिल्ह्यातील १३ वाळूघाट निश्चित करण्यात आले असून या वाळू घाटांवरील १० टक्के साठा राखीव ठेवण्यात आला आहे. बीड जिल्ह्याच्या विविध भागांमधील लहान
बीडमध्ये घरकुल योजनेतील लाभार्थींना ५ ब्रास वाळू मोफत देण्यात येणार


बीड, 30 डिसेंबर (हिं.स.)।

घरकुल योजनेतील लाभार्थींना ५ ब्रास वाळू मोफत देण्यात येणार आहे. त्यासाठी बीड जिल्ह्यातील १३ वाळूघाट निश्चित करण्यात आले असून या वाळू घाटांवरील १० टक्के साठा राखीव ठेवण्यात आला आहे.

बीड जिल्ह्याच्या विविध भागांमधील

लहान नद्या, नाले आणि ओढ्यांमधील वाळूही लाभार्थीना देण्याचे आदेश दिले आहेत. यासंदर्भात प्रशासकीय स्तरावर हालचाली सुरू झाल्या आहेत. जिल्ह्यातील ८० वाळूघाटांमधून १२७१ लाभार्थींना २४६४ ब्रास वाळू मोफत दिली आहे. ३६ वाळू घाटांमधून ३७,१२९ ब्रास वाळू राखीव ठेवण्यात आली आहे. सध्या ई-निविदा प्रक्रियेतून लिलावात गेलेल्या १० वाळूघाटांमधून ९०९९ ब्रास वाळू लाभार्थीना देण्यात येणार आहे. अशी माहिती मिळाली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande