
नांदेड, 30 डिसेंबर, (हिं.स.)। किनवट नांदेड ते मुंबई धावणाऱ्या 'राज्यराणी' एक्स्प्रेस तसेच तपोवन रेल्वे गाडीचा विस्तार आदिलाबादपर्यंत करावा, अशी मागणी रेल्वे प्रवाशांकडून होत आहे. मात्र, या मागण्या अजूनही पूर्ण झाल्या नाहीत.
नांदेड येथून रात्री १० वाजता मुंबईकरिता राज्यराणी एक्स्प्रेस सुटते. या रेल्वे गाडीचा विस्तार आदिलाबादपर्यंत झाला तर आदिलाबाद, किनवट व त्या पुढील रेल्वेस्थानकांवरुन मुंबई येथे जाणाऱ्या व मुंबई येथून येणान्या प्रवाशांच्या सोयीचे होणार आहे. काझीपेठ ते मुंबई ही साप्ताहिक गाडी रद्दच आहे. सदर रेल्वे गाडीची फेरी पूर्ववत सुरू झाली तर तेही प्रवाशांच्या सोयीचे होणार आहे. या रेल्वे मार्गावरील रेल्वे विषयक प्रलंबित मागण्यांकडे रेल्वे विभागाने लक्ष द्यावे. तसेच आदिलाबाद व हिंगोलीच्या खासदारांनी हा प्रश्न लावून धरावा, अशी मागणीही रेल्वे प्रवाशांकडून होत आहे. सदर मागणीची दखल घेतल्यास रेल्वे प्रवास अजून सुकर होईल, असे प्रवाशांचे म्हणणे आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis