अहमदपूर तहसीलदारांच्या बनावट सह्या, शिक्क्यांचा वापर; ६ जणांवर गुन्हा दाखल
लातूर, 31 डिसेंबर (हिं.स.) : तहसीलदार अहमदपूर यांच्या बनावट सह्या, बनावट शिक्के आणि खोटे आदेश तयार करून शासनाची फसवणूक केल्याचा खळबळजनक प्रकार अहमदपूर येथे उघडकीस आला आहे. या प्रकरणी नायब तहसीलदार अभिलाष महादेव जगताप यांच्या फिर्यादीवरून अहमदपूर पो
Ahmedpur Tehsildar's fake signatures and stamps used; Case registered against 6 people including online center operator


लातूर, 31 डिसेंबर (हिं.स.) : तहसीलदार अहमदपूर यांच्या बनावट सह्या, बनावट शिक्के आणि खोटे आदेश तयार करून शासनाची फसवणूक केल्याचा खळबळजनक प्रकार अहमदपूर येथे उघडकीस आला आहे. या प्रकरणी नायब तहसीलदार अभिलाष महादेव जगताप यांच्या फिर्यादीवरून अहमदपूर पोलीस ठाण्यात ६ जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, १ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत आरोपींनी संगनमत करून हा बनावटगिरीचा डाव रचला. अहमदपूर नगरपरिषद क्षेत्रातील जन्म-मृत्यू नोंदणीसाठी तहसीलदारांच्या अधिकारातील आदेशांची आवश्यकता असते. आरोपींनी या अधिकाराचा गैरवापर करत तहसीलदारांची हुबेहूब बनावट सही आणि कार्यालयाचे बनावट शिक्के तयार केले. या आधारे त्यांनी जन्म-मृत्यू नोंदी घेण्याचे खोटे आदेश तयार करून शासनाची आणि प्रशासनाची मोठी फसवणूक केली. तपासादरम्यान आतापर्यंत तब्बल ३११ बनावट दस्तऐवज उघडकीस आले असून, हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

​नायब तहसीलदार अभिलाष जगताप यांनी दिलेल्या तक्रारीनंतर, अहमदपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या मार्गदर्शनाखाली

१) शेख अफरोज (पॉप्युलर झेरॉक्स, अहमदपूर)

२) निसार खुरेशी (रा. अहमदपूर)

३) फसाहत मिर (अली ऑनलाईन सेंटर, अहमदपूर)

४) गौस मनियार (रा. अहमदपूर)

५) बिलाल मौलाना (रा. अहमदपूर)

६) मतिन शेख (नॅशनल ऑनलाईन, अहमदपूर)

​यांच्यावर अहमदपूर पोलीस स्टेशन येथे कलम ३१८(४), ३४०(२), ३३६(३) आणि ३(५) BNS अन्वये गुन्हा (रजि. नं. ८३७/२०२५) दाखल करण्यात आला आहे.

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande