
लातूर, 31 डिसेंबर (हिं.स.)।
लातूरच्या औद्योगिक प्रगतीमधील आजचा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल. लातूरची पहिली कंपनी म्हणून 'बाई-काकाजी पॉलिमर्स' आज बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) अंतर्गत सुचिबद्ध (Listing) झाली आहे. या ऐतिहासिक यशाचा 'लिस्टिंग सेरेमनी' सोहळा आज लातूरमधील कार्निवल रिसॉर्ट येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या सोहळ्याला राज्याचे उद्योग राज्यमंत्री इंद्रनील नाईक, कंपनीचे संचालक बालकिशन मुंदडा, हरिकिशन मुंदडा, प्रदीप राठी, BSE चे राम गिरी, हेम सिक्युरिटीचे अध्यक्ष अभिषेक पांडे यांच्यासह या कार्यक्रमास उपस्थित राहीलो. या यशाबद्दल कंपनीचे संचालक आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन करुन मुंदडा परिवाराला त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीस मनापासून शुभेच्छा दिल्या.
बाई-काकाजी पॉलिमर्स ही लातूरची पहिली कंपनी आहे जी BSE वर रजिस्टर होत आहे. लातूरच्या शिरपेचात रोवलेला हा मानाचा तुरा असून, या सुचिबद्धतेचा आम्हाला सार्थ अभिमान आहे,
लातूरच्या औद्योगिक क्रांतीमधील हा मैलाचा दगड ठरला असून, यामुळे स्थानिक उद्योजकांना एक नवी प्रेरणा मिळणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis