बिर्ला राममंदिरात ५०१ विद्यार्थ्यांच्या शंखनादाने परिसर झाला मंगलमय
अकोला, 31 डिसेंबर (हिं.स.)।अयोध्येतील प्रभू श्रीरामांच्या नवसाकार मूर्तीच्या पुनर्स्थापनेच्या १० लाख १९ हजार ५२० सेकंदांच्या पावन पूर्णतेनिमित्त जठारपेठ येथील बिर्ला राममंदिरात बुधवार, दि. ३१ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता प्रभू श्रीरामचंद्राची पूजा व
Photo


अकोला, 31 डिसेंबर (हिं.स.)।अयोध्येतील प्रभू श्रीरामांच्या नवसाकार मूर्तीच्या पुनर्स्थापनेच्या १० लाख १९ हजार ५२० सेकंदांच्या पावन पूर्णतेनिमित्त जठारपेठ येथील बिर्ला राममंदिरात बुधवार, दि. ३१ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता प्रभू श्रीरामचंद्राची पूजा व महाआरती करण्यात आली. त्यानंतर ५०१ शालेय विद्यार्थ्यांच्या सामूहिक शंखनादाने संपूर्ण परिसर मंगलमय झाला.

शंखनादाच्या दिव्य ध्वनींनी मंदिर परिसरासह आजूबाजूचा परिसर भक्तीमय झाला होता. शेकडो भाविकांच्या उपस्थितीत झालेल्या या शंखनादामुळे वातावरणात अध्यात्मिक उत्साह संचारला होता. प्रभातसमयी घुमणाऱ्या शंखनादामुळे संपूर्ण परिसर रामनामाने दुमदुमून गेला.याच निमित्ताने २४ तासांचा अखंड रामनाम जप सुरू करण्यात आला असून, हा जप १ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत अखंडपणे सुरू राहणार आहे.ॲड. धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्प व भारत विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रभू श्रीरामचंद्राची विधिवत पूजार्चना व महाआरतीनंतर शंखनादास प्रारंभ करण्यात आला.या वेळी विनायक पांडे, संदेश खंडेलवाल, महेंद्र कवीश्वर, दिलीप देशपांडे, विनोद देव, मुकुंद कुलकर्णी, सीमा सरदेशपांडे, भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अनिल पिंपरकर, नीलेश देव, जयंत सरदेशपांडे, गणेशराव मैंद, रश्मी देव तसेच भारत विद्यालयाचे उपमुख्याध्यापक योगेश मल्लेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande