अकोला : शिंदे सेनेत भाषिक वाद पेटला
अकोला, 31 डिसेंबर (हिं.स.)। शिवसेनेचे शहर प्रमुख रमेश गायकवाड यांना एबी फॉर्म न दिल्यामुळे त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे या दरम्यान मराठी गुजराती शिंदेसेनेत भाषिक वाद, ''गुजराती''साठी डावलला ''मराठी उमेदवार'' वाद होण्याचे चिन्ह दि
अकोला : शिंदे सेनेत भाषिक वाद पेटला


अकोला, 31 डिसेंबर (हिं.स.)। शिवसेनेचे शहर प्रमुख रमेश गायकवाड यांना एबी फॉर्म न दिल्यामुळे त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे या दरम्यान मराठी गुजराती शिंदेसेनेत भाषिक वाद, 'गुजराती'साठी डावलला 'मराठी उमेदवार' वाद होण्याचे चिन्ह दिसून येत आहेत. यादरम्यान या प्रकरणावर मंत्री प्रतापराव जाधव यांनी शिवसेने चे उपनेते गोपीकिशन बाजोरिया यांच्याशी संपर्क साधत गुजराती उमेदवाराला तिकीट देऊन मराठी उमेदवाराला डावल्याबाबत जाब विचारला दोघांमधील संभाषणाची व्हिडिओ क्लिप आता व्हायरल झाली असून गुजराती फॅक्टर मुळे मराठी कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप तिकीट नाकारलेल्या उमेदवारांकडून होतोय..

केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव आणि गोपीकिशन बाजोरिया यांच्यातील संवाद..

उपनेते बाजोरिया :- ती बाई मानतच नाही, काय करावं.. माझी तिकीट परत घ्या आणि माझे दोन्हीही उमेदवारांचं तिकीट परत घ्या. असं ती म्हणाली.

मंत्री प्रतापराव जाधव :- हहह..

उपनेते बाजोरिया :- तुम्हाला सांगू का? काय झालं मंत्री महोदय ती आधी आपल्या हजबेंड ला द्या..

मंत्री प्रतापराव जाधव :- कोण?

उपनेते बाजोरिया :- उषा विरक मी हसबेंड ला देत नाही असं म्हटलं.. मी तिच्या पतीची तिकीट कापली.

उपनेते बाजोरिया :- बीजेपी ने गुजराती समाजाला तिकीट दिली नाही, वार्डामध्ये 4000 गुजराती समाज आहे. त्या गुजराती समाजाच्या 300 लोकांना आणलं म्हणे साहेब.. आम्ही बीजेपी ला सर्व गुजराती समाज बायकॉट करणार आहे असं ते म्हणाले. त्यामुळे आम्हाला एक कॅंडिडेट द्या म्हणून तो कॅंडिडेट दिलाय..

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande