वृद्धाश्रमातील आजीबाईंचेही दणक्यात ‘थर्टी फर्स्ट’; आरबीजीकडून माहेरच्या साडीचे खास ‘गिफ्ट‘
* मधुरा गेठेंनी भरविलेला ‘माहेरवाशीण’ सोहळा आजीबाईंनी फुलवला… मुंबई, 31 डिसेंबर (हिं.स.) : वृद्धाश्रमातील सगळ्या आजींच्या डोळ्यांत उत्सुकता होती आणि प्रतीक्षाही होती. ती, ''माहेरची साडी’ कशी असेल, कोण आणेल ? याची ! सगळीकडे ‘थर्टी फर्स्ट’चा गरमागरम
वृद्धाश्रम


* मधुरा गेठेंनी भरविलेला ‘माहेरवाशीण’ सोहळा आजीबाईंनी फुलवला…

मुंबई, 31 डिसेंबर (हिं.स.) : वृद्धाश्रमातील सगळ्या आजींच्या डोळ्यांत उत्सुकता होती आणि प्रतीक्षाही होती. ती, 'माहेरची साडी’ कशी असेल, कोण आणेल ? याची ! सगळीकडे ‘थर्टी फर्स्ट’चा गरमागरम माहोल असताना, एका वृद्धाश्रमातील साऱ्या आजीबाई ‘माहेरवाशीण’ झाल्या अन् चक्क दोन-चार तास आपल्या हक्काच्या माहेरच्या जुन्या आठवणींत रमल्या. तेव्हा काही जणींच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या, पण ‘आरबीजी फाउंडेशन’च्या मधुरा गेठेंचा आपलेपणा पाहून आनंदाने हसल्याही…

हा योग जुळून आला होता, नवी मुंबईमध्ये कार्यरत आरबीजी फाउंडेशनच्या अध्यक्ष मधुरा गेठे यांच्यामुळे. विशेष

म्हणजे, या आजीबाईंना खरोखरीच माहेरची ऊब देण्यासाठी मधुरा गेठेंनी साऱ्या जणींना ‘माहेरची साडी' दिली. तेही प्रत्येक आजीबाईला हव्या त्या रंगाच्या, डिझाइनच्या दोन-दोन साड्या निवडता आल्या. याक्षणी आजीबाईंच्या डोळ्यांमध्ये कौतुकाचे हसूही लपून राहिले नाही.

वृद्धाश्रमातल्या सगळ्या आज्जीबाई बुधवारी सकाळी छान तयार होऊन आल्या होत्या. वृद्धाश्रमात येण्यामागची प्रत्येकीची कहाणी निराळी, दुःखही वेगळे. पण नव्या वर्षाला सामोरे जाताना, या आपुलकी, मायेने भरलेला हा कार्यक्रम सगळ्याच आजीबाईनी चांगला फुलवला.

आरबीजी फाउंडेशन आणि मधुराताई गेठे यांच्याप्रती सगळ्या आजीबाईंनाी कृतज्ञता तर व्यक्त केलीच; पण लाख मोलाचे आशीर्वादाचे धनही दिले.

या सोहळ्याबाबत बोलताना मधुरा गेठे यांनी आपल्या

भावना मांडल्या. त्या म्हणाल्या, ‘’आयुष्याच्या प्रत्येक वळणावर महिलेला माहेरची ओढ असते. ती ओढ उतारवयातही आठवणींत ओढते आणि व्याकूळ करते. माहेरचा आनंद आजीबाईंच्या चेहरा यावा, तो टिकून राहावा, या कौटुंबिक भावनेतूनच आम्ही एकमेकांशी बोलत होतो. त्यातून प्रत्येकजणी आज काही तास का होईना पण माहेरी आले, असे वाटले. यानिमित्ताने केक कापून सरत्या वर्षाला निरोप दिला आणि नववर्षाचे स्वागत झाले. याचेही समाधान आम्ही आज वाटून घेतलं. ‘’

आजींसोबत चिमुरड्यांचीही धमाल…

वृध्दाश्रम रंगलेल्या या सोहळ्यात आजीबाईंसोबत चिममुरडेही उत्साहाने सहभागी झाले आणि एकाच वेळी आजी, आजोबा आणि नातवंडांचा गोतावळाच पाहायला मिळाला. चॉकलेट आणि केक कापून या बालगोपाळांनी नाताळचे सेलिब्रेशन केले. या सगळयांच्या आनंदाने कार्यक्रमाला कौटुंबिक साज चढला.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande