महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अल्पसंख्याक विभागाच्या प्रदेश महासचिवांचा राजीनामा
अकोला, 31 डिसेंबर (हिं.स.) : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश महासचिव मोहम्मद जमीर शेख हनीफ यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. हा राजीनामा त्यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश अध्यक्ष हाजी वजाहत मि
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अल्पसंख्याक विभागाच्या प्रदेश महासचिवांचा राजीनामा


अकोला, 31 डिसेंबर (हिं.स.) : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश महासचिव मोहम्मद जमीर शेख हनीफ यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. हा राजीनामा त्यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश अध्यक्ष हाजी वजाहत मिर्झा साहेब यांच्याकडे पत्राद्वारे सादर केला आहे.

आपल्या राजीनामा पत्रात मोहम्मद जमीर शेख हनीफ यांनी नमूद केले आहे की, ते गेल्या सुमारे 30 वर्षांपासून काँग्रेस पक्षासाठी प्रामाणिकपणे आणि निष्ठेने कार्यरत होते. त्यांनी 2017 साली झालेल्या अकोला महानगरपालिका निवडणुकीत त्यांच्या मातोश्री अस्तबी शेख हनीफ यांना काँग्रेस पक्षाकडून प्रभाग क्रमांक 1, नायगाव–अकोट फैल येथून उमेदवारी देण्यात आली होती आणि त्या मोठ्या मताधिक्याने निवडूनही आल्या होत्या, असेही त्यांनी सांगितले.मात्र, स्थानिक दबाव व अंतर्गत परिस्थितीमुळे त्यानंतर त्यांच्या उमेदवारी व राजकीय भूमिकेबाबत सातत्याने मानसिक त्रास सहन करावा लागला, असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. स्थानिक राजकारण व हस्तक्षेपामुळे पक्षातील निष्ठावान कार्यकर्त्यांवर अन्याय झाला, अशी भावना त्यांनी व्यक्त केली असून त्यामुळे ते व्यथित असल्याचेही त्यांनी सांगितले.या सर्व बाबींचा विचार करता, मोहम्मद जमीर शेख हनीफ यांनी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अल्पसंख्याक विभागाच्या प्रदेश महासचिव पदाचा राजीनामा स्वीकारावा, अशी विनंती पक्ष नेतृत्वाकडे केली आहे.पक्ष नेतृत्वाबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना त्यांनी सांगितले की, त्यांनी आपल्या आयुष्यातील महत्त्वाची वर्षे काँग्रेस पक्षाच्या सेवेसाठी दिली, मात्र सध्याच्या परिस्थितीत हा निर्णय घेणे अपरिहार्य झाले होते.या राजीनाम्यानंतर अकोला जिल्ह्यासह काँग्रेस अल्पसंख्याक संघटनेत राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande