चंद्रपूर मनपा - ५६२ उमेदवारांचे नामांकन वैध, २२ जणांचे अवैध
चंद्रपूर, 31 डिसेंबर (हिं.स.)। नामांकन अर्ज छाननीच्या दिवशी बुधवारी चंद्रपुर महानगरपालिका निवडणुकी साठी ५६२ उमेदवारांचे नामांकन वैध तर २२ जणांचे नामांकन अवैध ठरले. मनपा निवडणूकीसाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची ५ कार्यालये मिळुन ५८४ अर्ज अंतिमरित्
चंद्रपूर मनपा - ५६२ उमेदवारांचे नामांकन वैध, २२ जणांचे अवैध


चंद्रपूर, 31 डिसेंबर (हिं.स.)।

नामांकन अर्ज छाननीच्या दिवशी बुधवारी चंद्रपुर महानगरपालिका निवडणुकी साठी ५६२ उमेदवारांचे नामांकन वैध तर २२ जणांचे नामांकन अवैध ठरले.

मनपा निवडणूकीसाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची ५ कार्यालये मिळुन ५८४ अर्ज अंतिमरित्या स्वीकारण्यात आले होते. यातील ५६२ उमेदवारांचे नामांकन वैध तर २२ जणांचे नामांकन अवैध ठरले आहे. नामनिर्देशनपत्रांची छाननी बुधवारी सकाळी ११ वाजल्यापासुन करण्यात आली. सायंकाळी छाननी पूर्ण झाल्यानंतर वैधरित्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande