
नंदुरबार,, 31 डिसेंबर (हिं.स.) शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत जिल्ह्यातील पात्र
उमेदवारांना इस्त्रायल देशामध्ये रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती कौशल्य
विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे प्रभारी सहायक आयुक्त मंगेश वाघ यांनी कळविले आहे.
या भरती प्रक्रियेद्वारे नूतनीकरण बांधकाम (Renovation Construction) क्षेत्रात एकूण 2 हजार 600
पदांसाठी नोकरीची संधी उपलब्ध असून प्लास्टरिंग काम (Plastering work), सिरॅमिक टाइलिंग
(Ceramic Tiling), ड्रायवॉल काम (Drywall Work) व मेसन/ गवंडी काम ( Mason) या पदांसाठी
भरती होणार आहे.
पात्रतेचे निकष
अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी खालील निकष आवश्यक आहेत.
शैक्षणिक पात्रता: किमान 10 वी उत्तीर्ण असावे.
वयोमर्यादा: 25 ते 50 वयोगटातील उमेदवार पात्र आहेत.
अनुभव: उमेदवाराकडे संबंधित क्षेत्रात कमीत कमी 3 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.
अर्ज प्रक्रिया
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अधिक माहितीसाठी
विभागाच्या https://maharashtrainternational.com या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
संकेतस्थळावरील लेटेस जॉब (Latest Jobs) या पर्यायाद्वारे उमेदवारांना अर्ज करण्याची संधी उपलब्ध
होईल तसेच, इच्छुक उमेदवार कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रात उपलब्ध
असलेल्या बारकोडवर स्कॅन करून गुगल फॉर्म सादर करू शकतात.
या संधीचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र उमेदवारांनी लाभ घ्यावा, असेही आवाहन केले
आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर