रायगडमध्ये मोफत कॅन्सर व्हॅन मोहीम तपासणी
रायगड, 31 डिसेंबर, (हिं.स.)। कॅन्सरचा लवकर शोध लागून वेळेत उपचार मिळावेत, या उद्देशाने रायगड जिल्ह्यात दि. 01 जानेवारी ते दि. 31 जानेवारी 2026 या कालावधीत कॅन्सर तपासणी व्हॅन मोहिमेचे आयोजन केले जात आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निशिकांत पाटील यांन
रायगडमध्ये मोफत कॅन्सर व्हॅन मोहीम  तपासणी;  १ ते ३१ जानेवारी


रायगड, 31 डिसेंबर, (हिं.स.)। कॅन्सरचा लवकर शोध लागून वेळेत उपचार मिळावेत, या उद्देशाने रायगड जिल्ह्यात दि. 01 जानेवारी ते दि. 31 जानेवारी 2026 या कालावधीत कॅन्सर तपासणी व्हॅन मोहिमेचे आयोजन केले जात आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निशिकांत पाटील यांनी नागरिकांना मोफत तपासणीचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

उपसंचालक आरोग्य सेवांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात कॅन्सर तपासणीसाठी व्हॅन उपलब्ध केली जाईल. मोहिमेअंतर्गत थळ, वाघोली, कोर्लई, तळा, दिघी, नेरूळ, पाभरे, कापडे, टोल, वरंध, निजामपूर, साई, धाटाव, रोहा, जांभूळपाडा, आरव, आमटेम, अंजप, कर्जत, वडवळ, होनाड, आजीवली, जासई, पोयंजे अशा गावांमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रांमार्फत तपासणी होईल.

व्हॅनसोबत एक स्त्रीरोगतज्ज्ञ, एक दंतशल्यचिकित्सक व सहाय्यक परिचारिका उपस्थित राहतील. प्रत्येक दिवसाला किमान १५० नागरिकांची तपासणी करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या मोहिमेचा मुख्य हेतू ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचवणे तसेच कॅन्सरसारख्या गंभीर आजाराबाबत जनजागृती करणे आहे.

या मोहिमेत जिल्ह्यातील विविध वैद्यकीय अधिकारी, दंतशल्यचिकित्सक, अधीपरिसेवक व सहाय्यक परिचारिकांचा समावेश आहे. या संघटनेत डॉ. र्किती रंगनाथन, डॉ. श्रेया पाटील, डॉ. पीकेश कुलकर्णी, डॉ. रामदास तारपेवाड, डॉ. कृष्णा सोनावने, डॉ. अश्विनी सोनावले, डॉ. स्वाती नाईक, डॉ. भानुदास गिरी, डॉ. नविना ठाकूर, डॉ. झापकर, डॉ. प्रदयुम्न ठोंबरे, डॉ. ऋतुजा माळी, डॉ. गणेश मेंगाळ, डॉ. सायली बेलगे, डॉ. शेखर वानखेडे, डॉ. अमोल नगराळे, डॉ. राजन यादव, डॉ. अतुल देशमुख यांचा समावेश आहे.

जिल्ह्यातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधीपरिचारिका व सहाय्यक परिचारिकाही मोहिमेत सहभागी होतील. नागरिकांनी वेळेत तपासणी करून आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे, असे डॉ. पाटील यांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande