रायगड - जिल्ह्याच्या विकासाची माहिती पुस्तिकेत; किशन जावळे यांच्या हस्ते प्रकाशन
रायगड, 31 डिसेंबर, (हिं.स.)। “रायगड जिल्ह्याचे सन 2025 चे जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन” या पुस्तिकेचे प्रकाशन जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाले. या प्रकाशनानिमित्त आयोजित कार्यक्रमात जिल्हा नियोजन अधिकारी
जिल्ह्याच्या विकासाची माहिती पुस्तिकेत; किशन जावळे यांच्या हस्ते प्रकाशन


रायगड, 31 डिसेंबर, (हिं.स.)। “रायगड जिल्ह्याचे सन 2025 चे जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन” या पुस्तिकेचे प्रकाशन जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाले. या प्रकाशनानिमित्त आयोजित कार्यक्रमात जिल्हा नियोजन अधिकारी उमेश सूर्यवंशी, दिप्ती पांडे आणि सांख्यिकी कार्यालयाचे कर्मचारी उपस्थित होते.

ही पुस्तिका रायगड जिल्ह्याच्या सामाजिक आणि आर्थिक विकासाचा सखोल आढावा घेण्यासाठी तयार करण्यात आली आहे. यामध्ये जिल्ह्याच्या लोकसंख्या, रोजगार, शिक्षण, आरोग्य, कृषी, उद्योग, पायाभूत सुविधा, महिला व बालविकास, सामाजिक कल्याण आणि विविध सरकारी योजनांचा तपशीलवार आढावा दिला आहे.

जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी कार्यक्रमात सांगितले की, ही पुस्तिका प्रशासन, शासकीय अधिकारी, शैक्षणिक संस्था, संशोधक आणि नागरिकांसाठी महत्त्वाची माहिती पुरवणारी साधन ठरेल. या माध्यमातून जिल्ह्याच्या विविध क्षेत्रांतील प्रगती, आव्हाने आणि पुढील धोरणात्मक योजना ठरविण्यास मदत होईल.

जिल्हा नियोजन अधिकारी उमेश सूर्यवंशी यांनी सांगितले की, पुस्तिकेत सादर केलेली माहिती अधिकृत सांख्यिकी अहवालांवर आधारित असून जिल्ह्यातील विकास कामांचे सत्यप्रतिबिंब देते. तसेच कार्यक्रमात उपस्थितांनीही पुस्तिकेची माहिती मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रातील धोरणात्मक निर्णय घेणाऱ्या सरकारी विभागांसाठी, शास्त्रज्ञांसाठी तसेच नागरिकांसाठी ही पुस्तिका उपयुक्त ठरेल, अशी अपेक्षा आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने यासंदर्भात पुढील काळात या माहितीचा वापर करून विकासात्मक योजना राबविण्याचे निर्देश दिले आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande