
नांदेड, 31 डिसेंबर, (हिं.स.)। कत्तलीसाठी घेवून जाणाऱ्या पाच गोवंश जनावरांची सुटका करून, कंधार पोलिसात दोघांजणा विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कंधार पोलिसांना गोपनीय माहिती मिळाल्यानंतर साहायक पोलीसनिरीक्षक विकास कोकाटे, पोलीस कर्मचारी डिकळे,
चोपवाड, टाकरस, चालक ताटे यांनी कारवाईसाठी निघाले. कंधार बाचोटी रस्त्यावर मानसपुरी गावाजवळ टेकडीवर एम. एच. २६ एडी ८७७५ क्रमांकाचे बोलेरो पिकअप चारचाकी वाहनात गोवंश जातीचे पाच जनावरे कमी जागेत कोंबून त्यांच्या तोंडाला दोरीने घट्ट बांधुन कत्तल करण्यासाठी घेवून जाताना वाहतूक करताना मिळून आले.
कंधार पोलिसांनी बोलेरो पीकपमधील यांना ताब्यात घेवून त्यांच्या ताब्यातील १८ हजार रुपयांची एक, १५ हजार रुपयांची एक, १३ हजार रुपयांची एक, १० हजार रुपयांची एक, १० हजार रुपयांचे एक असे ६६ हजार रुपये किमतीचे गोवंश जातींचे पाच जानावरे तसेच तीन लाख रुपये किमतीचे जुने बोलेरो पिकअप वाहन असा एकूण ३ लक्ष ६६ हजार रुपयांचा जप्त केला. सहायक पोलीस निरीक्षक विकास कोकाटे यांच्या फिर्यादीवरून कंधार पोलिसात पंडित भागवत कौशल्ये व शादुल पाशा कुरेशी या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis