सोलापूर : समाज कल्याणच्या निवासी शाळा व वस्तीगृहांची तपासणी करावी   - जिल्हाधिकारी
सोलापूर, 31 डिसेंबर (हिं.स.)। सोलापूर जिल्ह्यात समाज कल्याण कार्यालय अंतर्गत सुरू असलेल्या 2 निवासी शाळा तसेच 16 वस्तीगृहांची तपासणी करून या ठिकाणी राहून शिक्षण घेत असलेल्या दीड हजार पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना शासन नियमाप्रमाणे सुविधा उपलब्ध
सोलापूर : समाज कल्याणच्या निवासी शाळा व वस्तीगृहांची तपासणी करावी   - जिल्हाधिकारी


सोलापूर, 31 डिसेंबर (हिं.स.)। सोलापूर जिल्ह्यात समाज कल्याण कार्यालय अंतर्गत सुरू असलेल्या 2 निवासी शाळा तसेच 16 वस्तीगृहांची तपासणी करून या ठिकाणी राहून शिक्षण घेत असलेल्या दीड हजार पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना शासन नियमाप्रमाणे सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत का याबाबतचा अहवाल सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले.जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित जिल्हा दक्षता समिती तसेच वस्तीगृह समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद मार्गदर्शन करत होते. यावेळी समाज कल्याण च्या सहाय्यक आयुक्त सुलोचना सोनवणे, जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी प्रसाद मिरकले यांच्यासह अन्य समिती सदस्य उपस्थित होते.जिल्हाधिकारी आशीर्वाद पुढे म्हणाले की समाज कल्याण विभाग अंतर्गत दोन निवासी शाळेतील दोनशे विद्यार्थी तसेच 16 वस्तीगृहात राहणारे 1377 विद्यार्थ्यांना शासन नियमाप्रमाणे सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. यासाठी समाज कल्याण विभागाने शासन नियमाप्रमाणे महिन्यातून दोन वेळा भेटी देऊन पाहणी करणे आवश्यक आहे. तसेच समाज कल्याण च्या सहाय्यक आयुक्त यांनी जानेवारी 2026 या महिन्यात प्रांत अधिकारी, तहसीलदार, समाज कल्याण निरीक्षक, वसतिगृह अधीक्षक, समाज कल्याणचे कर्मचारी यांनी उपरोक्त वस्तीहगृह, निवासी शाळांना भेटी देऊन तपासणी करण्याबाबतचे आदेश काढावेत, असे निर्देश यावेळी त्यांनी दिले.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande