वर्षाच्या शेवटच्या दिवशी धनंजय मुंडे विठुरायाच्या चरणी नममस्तक
बीड, 31 डिसेंबर (हिं.स.)। गेला वर्षभर कायम वादात राहिलेले आणि मंत्रिपदी गमवावे लागलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार धनंजय मुंडे हे सरत्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक झाले. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कर
वर्ष सरले संकटे देखील सरल्याची माहिती


बीड, 31 डिसेंबर (हिं.स.)।

गेला वर्षभर कायम वादात राहिलेले आणि मंत्रिपदी गमवावे लागलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार धनंजय मुंडे हे सरत्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक झाले. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड प्रकरणामुळं धनंजय मुंडे हे संपूर्ण वर्षभर माध्यम आणि महाराष्ट्राच्या रडारवर होते. आज विठ्ठल दर्शनानंतर बऱ्याच उशिरा अखेर विठ्ठलाने बोलवले आणि दर्शन झाले असे सांगताना वर्ष सरलं त्याबरोबर संकटही सरली अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी दिली.

गेल्या वर्षभरात आलेल्या संकटांवर बोलताना प्रारब्ध देवालाही चुकला नाही असे सांगत ती सर्व संकटे उडवून आणलेली नाहीत तर जाणीवपूर्वक एखाद्याला अडवायचे अशा पद्धतीची ती संकट होती. आता साल सरलं आणि संकटही सरली असे सांगत वर्षभर झालेल्या त्रासावर पहिल्यांदाच मुंडे यांनी विठ्ठल मंदिरात आपल्या भावना व्यक्त केल्या.

वर्ष सरले संकटे देखील सरल्याची माहिती धनंजय मुंडे यांनी दिली

बऱ्याच वर्षांनी वर्ष सरायच्या आधी विठुरायाने मला बोलावल्याचे धनंजय मुंडे म्हणाले. साक्षात देवालाही प्रारब्ध चुकलं नाही, आपल्याला कसे चुकलं. देवालाही देखील संकट आल्याचे धनंजय मुंडे म्हणाले. जाणीवपूर्वक एखाद्याला आडवायचे अशी ही संकट होती. वर्ष सरले संकटे देखील सरल्याची माहिती धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande