
परभणी, 31 डिसेंबर (हिं.स.)। सेलू येथील नगरपरिषदेत काँग्रेस पक्षाच्या गटनेतेपदी पवन आडळकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांनी एकमताने ठराव मंजूर करून त्यांची या पदावर निवड केली. यावेळी नवनिर्वाचित नगरसेवक मिलिंद पवार, सौ. महनंदा आडळकर, सफिया बेगम अ. रशीद, पठाण मालनबी अफसरखान, प्रविना सभाजी पवार, विनोद धापसे, अमजद बागवान, अन्वर खान, सभाजी पवार, सुदर्शन शेरे तसेच अप्पू साडेगावकर आदी उपस्थित होते. निवडीनंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना गटनेते पवन आडळकर म्हणाले की, पक्षातील सर्व नगरसेवकांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास आणि दिलेली जबाबदारी निश्नित सेलू शहराच्या विकासासाठी दिशादर्शक ठरेल. त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष अधिक सक्षमपणे नागरिकांच्या मूलभूत सुविधांसाठी आणि शहराच्या सर्वांगीण विकासासाठी लढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या निवडीमुळे नगरपरिषदेत काँग्रेस पक्षाची भूमिका अधिक प्रभावी होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis