
पुणे, 31 डिसेंबर (हिं.स.)। पुणे जिल्ह्यात आरोग्य संस्थांनी समाजातील सर्व घटकांना दर्जेदार व वेळेत आरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्यासोबतच विविध आजाराविषयी जनजागृती कार्यक्रम राबवाबेत, जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय समन्वय समिती बैठकीत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सूचना दिल्या. यावेळभ् जिल्ह्यातील आरोग्य सेवांचा आढावा घेण्यात आला तसेच विविध आरोग्य योजनांच्या अंमलबजावणीबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.रामचंद्र हंकारे, निवासी वैद्यकीय डॉ. वंदना जोशी, यावेळी आरोग्य विभागाचे अधिकारी, विविध समित्यांचे सदस्य तसेच संबंधित इतर विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत माता व बाल आरोग्य, संसर्गजन्य आजारांचे नियंत्रण, लसीकरण, सार्वजनिक आरोग्य सुविधा तसेच आरोग्य विभागाच्या कामकाजातील प्रगती व अडचणी यावर विचारविनिमय करण्यात आला.नागरिकांना दर्जेदार व वेळेत आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.श्री.डुडी म्हणाले, ग्रामीण व शहरी भागात नागरिकांना बोगस डॉक्टराविषयी वस्तुस्थितीदर्शक माहिती देण्याकरिता ग्रामसभा, नगरपरिषद बैठकीत माहिती द्यावी. नागरिकांना गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदानतंत्र (लिंग निवडीस प्रतिबंध कायदा), १९९४ अंतर्गत जिल्हा दक्षता समिती कार्यरत आहे. लिंग निदानाबाबतhttps://amchimulgimaha.in/या संकेतस्थळावर तसेच 18002334475 आणि 104 या टोलफ्री क्रमांकवर तक्रार कराण्याबाबत माहिती द्यावी. सोनोग्राफी केंद्रांची काटेकोर तपासणी करून कायद्याची कडक अंमलबजावणी करावी.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु