नांदेड महापालिका निवडणूक : पती-पत्नीला दिली उमेदवारी
नांदेड, 31 डिसेंबर, (हिं.स.)। भारतीय जनता पक्ष सातत्याने घराणेशाहीविरोधी भूमिका मांडत असला तरी प्रत्यक्षात मात्र वेगळं चित्र पाहायला मिळत आहे. नुकत्याच पार पडलेल्या नांदेड जिल्ह्यातील लोहा नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजपने एकाच कुटुंबातील तब्बल सहा सद
एकाच कुटुंबातील ६ जणांचा पराभव, तरीही भाजपची घराणेशाहीची हौस कायम; आता पती-पत्नीला दिली उमेदवारी


नांदेड, 31 डिसेंबर, (हिं.स.)। भारतीय जनता पक्ष सातत्याने घराणेशाहीविरोधी भूमिका मांडत असला तरी प्रत्यक्षात मात्र वेगळं चित्र पाहायला मिळत आहे. नुकत्याच पार पडलेल्या नांदेड जिल्ह्यातील लोहा नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजपने एकाच कुटुंबातील तब्बल सहा सदस्यांना उमेदवारी देत घराणेशाहीचा कित्ता गिरवला होता. मात्र जनतेने या निर्णयाला स्पष्ट नकार देत एकाच घरातल्या त्या सहाही उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला.

नांदेड महानगरपालिका निवडणुकीत भाजपकडून एकाच कुटुंबातील पती-पत्नीला थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलं आहे. विशेष म्हणजे हे दोघेही यापूर्वी माजी महापौर आणि माजी सभापती म्हणून पदं भूषवलेले असून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे विश्वासू म्हणून त्यांची ओळख आहे. दरम्यान भाजपने एकाच कुटुंबातील दोघांना उमेदवारी दिल्याने या घराणेशाहीची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

भाजपने किशोर स्वामी यांना प्रभाग क्रमांक 9 आणि त्यांच्या पत्नी शैलेजा स्वामी यांना प्रभाग क्रमांक 4 मधून उमेदवारी दिली आहे. 2017 च्या निवडणुकीत काँग्रेसकडून दोघांना तिकीट देण्यात आलं होतं आणि दोघांनी विजय मिळवला. किशोर स्वामी हे यापूर्वी स्थायी समितीचे सभापती होते, तर त्यांच्या पत्नीला महापौरची संधी देण्यात आली होती.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande