अलिबागमध्ये दुचाकीची धडक; एक तरुण मयत, दुसरा गंभीर जखमी
रायगड, 31 डिसेंबर (हिं.स.)। मांडवा येथून अलिबागकडे जात असलेल्या दुचाकीचा भीषण अपघात चोंढी गावाजवळील पुलानजीक मंगळवारी (दि. ३०) रात्री साडेअकराच्या सुमारास घडला. रस्त्याच्या बाजूला असलेल्या फलकाच्या खांबाला दुचाकीची जोरदार धडक बसल्याने दुचाकीवरील दो
Two-wheeler collision in Alibaug; One youth dead, another seriously injured


रायगड, 31 डिसेंबर (हिं.स.)। मांडवा येथून अलिबागकडे जात असलेल्या दुचाकीचा भीषण अपघात चोंढी गावाजवळील पुलानजीक मंगळवारी (दि. ३०) रात्री साडेअकराच्या सुमारास घडला. रस्त्याच्या बाजूला असलेल्या फलकाच्या खांबाला दुचाकीची जोरदार धडक बसल्याने दुचाकीवरील दोघेजण गंभीर जखमी झाले. यामध्ये एका तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर दुसरा तरुण गंभीर अवस्थेत नवी मुंबई येथील एमजीएम रुग्णालयात उपचार घेत आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हर्षित पालवणकर व शिवम गुप्ता हे दोघे तरुण दुचाकीवरून मांडवा ते अलिबाग असा प्रवास करीत होते. चोंढी येथे पुलाजवळ आल्यानंतर अचानक दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने ती रस्त्याच्या कडेला असलेल्या फलकाच्या लोखंडी खांबावर आदळली. धडकेचा आवाज इतका मोठा होता की परिसरातील नागरिक घटनास्थळी धावून आले.

अपघातात दोन्ही तरुणांना गंभीर दुखापत झाली असून दुचाकीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ, किहीमचे सरपंच तसेच समाजसेवक पिंट्या गायकवाड यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पिंट्या गायकवाड यांनी आपल्या रुग्णवाहिकेच्या मदतीने जखमींना तत्काळ अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले.

दरम्यान, शिवम गुप्ता याची प्रकृती अधिक गंभीर झाल्याने त्याला पुढील उपचारासाठी नवी मुंबई येथील एमजीएम रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, हर्षित पालवणकर या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, भरधाव वेग आणि रस्त्यावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अलिबाग पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande