अमरावती जिल्ह्यातील 23 गावाचा ‘स्मार्ट व इंटेलिजेंट व्हिलेज’ प्रकल्पात समावेश
अमरावती, 4 डिसेंबर (हिं.स.) ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी ‘स्मार्ट व इंटेलिजेंट व्हिलेज'' प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यात जिल्ह्यातील 23 गावांचा समावेश करण्यात आला आहे.यात चांदुर बाजार तालुक्यातील बोराळा, आसेगाव, बेलोरा, टाकरखेडा
जिल्ह्यातील 23 गावाचा ‘स्मार्ट व इंटेलिजेंट व्हिलेज’ प्रकल्पात समावेश


अमरावती, 4 डिसेंबर (हिं.स.)

ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी ‘स्मार्ट व इंटेलिजेंट व्हिलेज' प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यात जिल्ह्यातील 23 गावांचा समावेश करण्यात आला आहे.यात चांदुर बाजार तालुक्यातील बोराळा, आसेगाव, बेलोरा, टाकरखेडा पूर्णा, चिंचोली काळे, तळणी पूर्णा, वडूरा, धानोरा, खरवाडी, सर्फाबाद, खराळा, फुबगाव, जवळा शहापूर, राजुरा, जैनपूर, बेसखेडा, तळवेल, शिरजगाव बंड, रसुल्लापुर, हैदतपूर, कृष्णापूर, विरूळ पूर्णा आणि अमरावती तालुक्यातील शिराळा गावाचा समावेश आहे. या प्रकल्पात अंतर्गत ग्रामपंचायमींमध्ये स्मार्ट सेवा यात सीसीटीव्ही सर्व्हेलन्स, वाय-फाय, हॉटस्पॉट, डिजिटल शिक्षण, आरोग्य सेवा, पशुसंवर्धन, महिला व बाल कल्याण आदी विभागाच्या ऑनलाईन सेवा आणि ई-प्रकल्प, स्मार्ट कृषि सेन्सर्स, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा टप्प्याटप्प्याने राबविण्यात येणार आहेत. या प्रकल्पासाठी राज्यात महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ हे भारतनेट फेज 2 नेटवर्कच्या देखमालीसह आवश्यक तांत्रिक सहाय्य उपलब्ध करुन देणार आहे.यासाठी ग्रामस्तरीय समिती स्थापन करण्यात येणार आहे. प्रत्येक निवडक गावात प्रकल्पाच्या अंमलबजावणी आणि प्रकल्पाच्या व्यवस्थापनासाठी ग्रामपंचायत स्तरावर 'स्मार्ट व इंटेलिजेंट व्हिलेज’ समिती स्थापन करण्यात येणार आहे. समिती प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी नागरिकांचा सहभाग उपलब्ध करून घेण्यात येणार आहे. तसेच नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देऊन सर्व सुविधा ग्रामस्थांकडून वापरण्यात येतील. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समिती प्रकल्पाचे पर्यवेक्षण करेल.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande