अमरावती : मनपाची प्रारुप मतदार यादी; शेवटच्या दिवस अखेर 871 आक्षेप दाखल
अमरावती, 4 डिसेंबर (हिं.स. महापालिका निवडणुकीसाठी गुरुवार २० नोव्हेंबरला मनपाची प्रारुप मतदार यादी जाहिर करण्यात आली होती. त्यानंतर २१ ते २७नोव्हेंबरदरम्यान प्रथम आक्षेप व हरकतीची मुदत दिली होती. यानुसार गुरुवार २७ नोव्हेंबर २०१५ आक्षेप नोंदविण्य
मनपाची प्रारुप मतदार यादी शेवटच्या दिवस अखेर 871 आक्षेप दाखल


अमरावती, 4 डिसेंबर (हिं.स.

महापालिका निवडणुकीसाठी गुरुवार २० नोव्हेंबरला मनपाची प्रारुप मतदार यादी जाहिर करण्यात आली होती. त्यानंतर २१ ते २७नोव्हेंबरदरम्यान प्रथम आक्षेप व हरकतीची मुदत दिली होती. यानुसार गुरुवार २७ नोव्हेंबर २०१५ आक्षेप नोंदविण्याचा शेवटचा दिवस होता. मात्र निवडणूक आयोगाकडून ३ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिल्याने आक्षेपांच्या संख्येत वाढ झाली आहे. बुधवारला शेवटच्या दिवस अखेर एकूण ८७१ आक्षेप दाखल करण्यात आले होते.

२० नोव्हेंबरला यादी जाहिर झाल्यानंतर पहिल्या दिवशी शुक्रवार २१ नोव्हेंबर रोजी २५ जणांनी आक्षेप दाखल केले होते. तर मंगळवार २४ नोव्हेंबरपर्यंत १०० जणांनी हरकती घेतल्या होत्या. आता सहाव्यादिवशी २६ नोव्हेंबरपर्यंत हरकतींची संख्या ही ४०५ एवढी झाली होती. त्यानंतर २७ नोव्हेंबर रोजी ३ डिसेंबरपर्यंत मुदत वाढ देण्यात आली होती. त्यामुळे बुधवारला शेवटच्या दिवस अखेर ८७१ आक्षेपदाखल करण्यात आले आहे. यामध्ये माजी महापौर, माजी सभापती, काही माजी नगरसेवक तसेच विविध पक्षाचे पदाधिकारी, इच्छुक उमेदवार व संघटनांचे पदाधिकाऱ्यांचा सुद्धा समावेश आहे. यामध्ये एका प्रभागातून नाव काढून दुसऱ्या प्रभागात समाविष्ठ करणे, मतदारीत यादीत नावाचे स्पेलिंग दुरुस्त करणे यासह अनेक आक्षेप प्राप्त झाले आहेत.आता प्रारूप मतदार यादीवर दाखल आक्षेप जागीच निरीक्षण करून व्हेरिफाय करण्यात येईल. त्यानंतर १० डिसेंबर २०१५ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. मतदान केंद्राच्या ठिकाणची यादी १५ डिसेंबरला व मतदान केंद्र निहाय मतदारयादी २२ डिसेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. १ जून २०२५ यादीनुसार २२ प्रभागातील ६ लाख ८१ हजार ५१९ मतदार मतदाराचाया यादित समावेश आहे.------------------------------------------------------

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande